स्वच्छता अभियान ही लोकचळवळ व्हावी : डॉ. सागर बोरुडे

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

स्वच्छता अभियान ही लोकचळवळ व्हावी : डॉ. सागर बोरुडे

अहमदनगर प्रतिनिधी:  संत गाडगेबाबा यांनी शेकडो वर्षापूर्वी स्वच्छतेचे महत्व जनतेला पटवून देण्याचे काम केले आहे. आजही आपण स्वच्छते वर काम करत आहोत.

मनपा शाळेतील विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण देणार – महापौर रोहिणी शेंडगे
तीन भावंडासह आईचा मृतदेह विहीरीत आढळला ; संगमनेर तालुक्यातील खांडगेदरा गावातील घटना
पोलिसांच्या निवडणुकीत चक्क जय श्रीराम पॅनेल

अहमदनगर प्रतिनिधी: 

संत गाडगेबाबा यांनी शेकडो वर्षापूर्वी स्वच्छतेचे महत्व जनतेला पटवून देण्याचे काम केले आहे. आजही आपण स्वच्छते वर काम करत आहोत. भारत सरकारने भारत स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून जनतेला एकत्रित करून स्वच्छतेचे महत्त्व पटवून देत आहे. 

यामध्ये नागरिकांनी पुढे येऊन आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी पुढाकार घ्यावा. स्वच्छतेच्या माध्यमातून नागरिकांचे आरोग्य सुदृढ व निरोगी राहण्यास मदत होते. 

आज महापालिकेच्या आरोग्य समितीच्या वतीने डॉन बॉस्को परिसरामध्ये नागरिकांच्या सहकार्यातून स्वच्छता अभियान राबविण्यात आले. स्वच्छता अभियान ही लोकचळवळ व्हावी यासाठी आम्ही प्रयत्न करीत असल्याचे प्रतिपादन डॉ सागर बोरुडे यांनी केले.

डॉन बॉस्को येथे मनपा आरोग्य समितीच्या वतीने स्वच्छता अभियान राबविण्यात आले यावेळी नगरसेवक सागर बोरुडे, डॉन बॉस्को शाळेचे प्राचार्य फादर जेम्स तुस्कानो, महानगरपालिका घनकचरा विभाग सावेडी मुख्य स्वच्छता निरीक्षण किशोर देशमुख, स्वच्छता निरीक्षण अविनाश हंस, विनीत गायकवाड, अजय थोरात डॉन बॉस्को परिसरातील नागरिक उपस्थित होते

COMMENTS