Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सोमवार 11 ऑक्टोबर रोजी संगमनेर बंद

संगमनेर (प्रतिनिधी)  उत्तर प्रदेशातील लखमीपुर मधील आंदोलन ग्रस्त शेतकर्‍यांच्या अंगावर गाडी घालून त्यांना ठार मारल्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडी

महसूलमंत्री ना. थोरात यांच्या नेतृत्वामुळे संगमनेरचा सहकार पॅटर्न दिशादर्शक – नामदार कदम
ना. थोरात यांच्या पाठपुराव्यातुन तालुक्यात 5 मेगाहोल्ट पावर ट्रांसफार्मर मंजूर
Sangamner : हजरत ख्वाजा पिरमोहंमद सादीक यांचा उरूस साध्या पद्धतीने साजरा

संगमनेर (प्रतिनिधी) 

उत्तर प्रदेशातील लखमीपुर मधील आंदोलन ग्रस्त शेतकर्‍यांच्या अंगावर गाडी घालून त्यांना ठार मारल्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडी सरकारच्या वतीने आयोजित केलेल्या बंदला संगमनेर काँग्रेस ,राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेने पाठिंबा दिला असून येत्या सोमवार दिनांक 10 ऑक्टोबर 2021 रोजी संपूर्ण संगमनेर शहर व तालुका बंद ठेवण्यात येत असल्याची माहिती काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब ओहोळ, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष आबासाहेब थोरात, शिवसेनेचे शहर प्रमुख अमर कातारी व काँग्रेसचे शहराध्यक्ष विश्वासराव मुर्तडक राष्ट्रवादीचे शहर प्रमुख प्रशांत वामन यांनी दिली आहे ..

महा विकास आघाडीच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीत असे म्हटले आहे की, मागील आठवड्यामध्ये लकखमीपूर येथे केंद्रीय मंत्र्याच्या मुलाने गाडी चालवून आंदोलन करत असलेल्या चार शेतकऱ्यांना ठार केले . हि अत्यंत दुर्दैवी घटना असून लोकशाहीला काळीमा फासणारी आहे. केंद्र सरकार हे देशातील शेतकऱ्यांच्या विरोधी असून मागील दहा महिन्यांपासून आंदोलन करते शेतकरी काळे कायदे रद्द करण्यासाठी मागणी करत आहेत .मात्र केंद्र सरकार अत्यंत उदासीन असून शेतकऱ्यांशी चर्चा करण्याऐवजी ते त्यांना चिरडण्याची भाषा करत आहे. या कृत्याच्या निषेधार्थ महाराष्ट्रामध्ये महा विकास आघाडी सरकारने सोमवार दिनांक 10 ऑक्‍टोबर रोजी बंदचे आवाहन केले आहे .

राज्याचे मुख्यमंत्री नामदार उद्धव ठाकरे ,उपमुख्यमंत्री नामदार अजित दादा पवार, व काँग्रेसचे नेते महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली महा विकास आघाडी सरकारने बंद साठी पुढाकार घेतला असून संगमनेर तालुका व शहर ही बंद करण्यात येणार आहे.

 या बंदमध्ये सर्व नागरिकांनी उस्फुर्त सहभाग घेत आपले सर्व दैनंदिन व्यवहार बंद ठेवून आंदोलन करत असलेल्या शेतकरी बांधवांना सक्रिय पाठिंबा द्यावा व शेतकऱ्यांना चिरडण्याच्या घटनेचा तीव्र निषेध नोंदवावा.  तसेच केंद्र सरकारने वाढलेली महागाई व सुरू केलेली दडपशाही याच्या निषेधार्थ असणाऱ्या या  बंदमध्ये सहभागी व्हावे असे आवाहनही भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना पक्ष, मित्र पक्ष व पुरोगामी संघटना वतीने करण्यात आले आहे.

COMMENTS