Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सोमवारी जनार्दन स्वामी हॉस्पिटलमध्ये सर्वरोग निदान शिबिराचे आयोजन

कोपरगाव / प्रतिनिधी : कोपरगाव औरंगाबाद महामार्गालगत कोकमठाण हद्दीतील सुसज्ज इमारतीत थाटलेले व रुग्णालयामार्फत महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य यो

एफआरपी द्या अन्यथा वसुली थांबवा : पाटील
कृषीकन्या पुंड हिने केले माका येथील शेतकऱ्यांना मार्गदर्शन
लाळ्या खुरकूत आजाराचे थैमान, चार गाईंचा मृत्यू

कोपरगाव / प्रतिनिधी : कोपरगाव औरंगाबाद महामार्गालगत कोकमठाण हद्दीतील सुसज्ज इमारतीत थाटलेले व रुग्णालयामार्फत महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया देण्यात श्री संत जनार्दन स्वामी रुग्णालय अल्पावधीत नावारुपाला आलेले आहे. सोमवार, दि. 02/05/2022 रोजी सकाळी 9.00 ते दुपारी 3.00 वाजेपर्यंत रुग्णालयात मोफत सर्वरोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती रुग्णालय व्यवस्थापकांनी दिली आहे.
या शिबिरात बी. पी., ई. सी. जी. तपासणी, शुगर, अ‍ॅन्जिओग्राफी, अ‍ॅन्जिओप्लास्टी, एक्सरेची मोफत तपासणी होणार असुन सवलतीच्या माफक दरात एमआरआय व सिटी स्कॅन करुन देणार आहे. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजने अंतर्गत मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्यामुळे शिबिराचा जास्त रुग्णांनी लाभ घेण्याचे आवाहन एसजेएस रुग्णालय व्यवस्थापनाने केले आहे.
श्री जनार्दन स्वामी हॉस्पिटलमध्ये उपलब्ध तज्ञ डॉक्टर डॉ. मयुर गंगवाल (मुत्ररोग तज्ञ) डॉ. नीरज काळे (हृदय शस्त्रक्रिया तज्ञ) डॉ. प्रसाद उंबरकर (न्युरो सर्जरी) डॉ. सौ. तेजश्री चव्हाण (नाईकवाडे) (नेत्ररोग तज्ञ), डॉ. अमित नाईकवाडे (अस्थिरोग तज्ञ), डॉ. सायली ठोंबरे (जनरल मेडिसिन), डॉ. शशांक तुसे (मेडिसिन विभाग), डॉ. आनंदकुमार भांगे (बालरोग तज्ञ), डॉ. महेश आहेर (हृदयरोग तज्ञ), डॉ. पुजा कातकडे (दंतरोग तज्ञ), डॉ. स्नेहल भाकरे (स्त्री-रोग तज्ञ), डॉ. प्रशांत सगळगिळे (नेत्ररोग तज्ञ), डॉ. राजेश माळी (जनरल सर्जन), डॉ. शिरिष शेळके (कान, नाक, घसा, तज्ञ), डॉ . राहुल पारदे (अस्थिरोग तज्ञ), डॉ. जयेश वाघुळदे (नेफरॉलॉजिस्ट), डॉ. तृप्ती भिसे (सोनोग्राफी तज्ञ), डॉ. रोहिणी घोरपडे (दंत-रोग तज्ञ), डॉ. अनिता गांगुर्डे (बालरोग शस्त्रक्रिया तज्ञ), डॉ. योगेश तोडकरी (मुत्ररोग तज्ञ), डॉ. सावणी यरनाळकर (होमिओपॅथिक तज्ञ), डॉ. योगेशकुमार गिते (आयुर्वेद तज्ञ) आदी डॉक्टर रुग्णालयासाठी उपलब्ध आहे.

COMMENTS