सोनसाखळी चोर १ लाखांच्या मुद्देमालासह अटकेत; न्यायालयाने दिली ४ दिवसांची पोलीस कोठडी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सोनसाखळी चोर १ लाखांच्या मुद्देमालासह अटकेत; न्यायालयाने दिली ४ दिवसांची पोलीस कोठडी

कर्जत/प्रतिनिधी : १२ जून रोजी खा. छत्रपती संभाजीराजे भोसले यांचा कोपर्डी येथे दौरा होता. या कार्यक्रमात फोटो घेताना पुणे येथील संजय  ठाकरे यांच्या गळ

मुलींची छेड काढल्याचा जाब विचारणे पडले महागात
शिर्डी येथे जम्बो कोविड सेंटर चालू करणे बाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन | ‘आपलं नगर’ | LokNews24*
आयजींच्या विशेष पथकाचा चासमध्ये जुगार अड्ड्यावर छापा

कर्जत/प्रतिनिधी : १२ जून रोजी खा. छत्रपती संभाजीराजे भोसले यांचा कोपर्डी येथे दौरा होता. या कार्यक्रमात फोटो घेताना पुणे येथील संजय  ठाकरे यांच्या गळ्यातील सोन्याची चैन चोरट्याने गर्दीचा फायदा घेत लंपास केली होती. त्यांनी कर्जत पोलीस स्टेशनला फिर्याद दिली होती. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी चोराचा शोध घेण्यासाठी कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या होत्या.
त्यानुसार आरोपीचा बीड, औरंगाबाद तसेच जामखेड येथे तपास करण्यात आला. दरम्यान हा गुन्हा बीड येथील आरोपींनी केला आहे अशी गोपनीय माहिती मिळाली. त्यावरून बीड येथून आरोपीस ताब्यात घेण्यात आले. यामध्ये उमेश सत्यभान टल्ले, वय :३३ वर्ष, रा. पेठ, बीड याने हा गुन्हा दत्ता जाधव, रा. बीड याच्या मदतीने केला असल्याचे सांगितले. या गुन्ह्यात पोलिसांनी उमेश टल्ले यास अटक केली. चोरी केलेला मुद्देमाल १००००० रुपये किमतीची २२ ग्रॅम सोन्याची चैन जप्त करण्यात आली. त्यास न्यायालयाने ४ दिवस पोलीस कोठडी मंजूर केली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सुनील माळशिकारे हे करीत आहेत. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश माने, सतीश गावित, पोलीस अंमलदार श्याम जाधव, पांडुरंग भांडवलकर, भाऊसाहेब यमगर, सुनिल खैरे, गोवर्धन कदम, विकास चंदन यांनी केली आहे.

COMMENTS