नवी दिल्ली/काबूल : अफगाणिस्तानवर तालिबानने ताबा मिळविल्यानंतर अमेरिकेने आपले सैन्य मागे घेण्यासाठी 31 ऑगस्टपर्यंतची मुदत तालिबानकडे मागतिली होती. मात
नवी दिल्ली/काबूल : अफगाणिस्तानवर तालिबानने ताबा मिळविल्यानंतर अमेरिकेने आपले सैन्य मागे घेण्यासाठी 31 ऑगस्टपर्यंतची मुदत तालिबानकडे मागतिली होती. मात्र अमेरिकेने आपले सैन्य पूर्णपणे माघारी घेण्याच्या आधीच तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा मिळवला. अमेरिका आपले सैन्य पूर्णपणे 31 ऑगस्टपर्यंत माघारी घेणार आहे. तर, दुसरीकडे तालिबानने अमेरिकेला धमकी दिली आहे. अमेरिकेने 31 ऑगस्टपर्यंत अफगाणिस्तानमधून पूर्ण सैन्य माघारी घ्यावेत. अन्यथा वाईट परिणाम भोगायला तयार राहा, असा इशाराच दिला आहे.
अमेरिकेने सैन्य माघारीसाठी 11 सप्टेंबर हा शेवटचा दिवस ठरवला होता. मात्र त्यानंतर 31 ऑगस्ट हा दिवस निश्चित करण्यात आला आहे. तालिबान्यांनी अगोदर कुणाचाही छळ करणार नाही, अशी समन्वयाची भूमिका घेतली होती. मात्र काही तासांमध्येच तालिबान्यांची दहशत आणि काबुलमधील भयावह वातावरणामुळे ही भूमिका मागे पडत, तणावपूर्ण वातावरण तयार झाले आहे. तालिबानचे प्रवक्ते सुहैल शाहीनने म्हटले की, अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी 31 ऑगस्टपर्यंत सैन्य माघारी घेणार असल्याचे म्हटले होते. त्यांनी दिलेला शब्द पाळावा. 31 ऑगस्टनंतर एकाही दिवसाची वाढीव मुदत मिळणार नसल्याचे तालिबानने म्हटले आहे. सैन्य माघारीसाठी एकही दिवस वाढवून मिळणार नाही. त्याशिवाय अमेरिका व इतर देशांना गंभीर परिणामांना सामोरे जावे लागू शकते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी आवश्यकता भासल्यास आणखी काही दिवस अमेरिकन सैन्य काबूलमध्ये राहू शकते असे वक्तव्य केले होते. त्यावर तालिबानने प्रतिक्रिया व्यक्त करताना अमेरिकेला धमकी दिली आहे.
दरम्यान, जगभरात तालिबान्यांचा विरोध करण्यात येत असला तरी, त्याविरोधात उभे कुणी राहतांना दिसून येत नपाही. तर दुसरीकडे असेही की धार्मिक नेते आहे जे तालिबान्यांचे समर्थन करत आहे. अमेरिकेच्या सैन्याने माघार घेताच तालिबान्यांनी अफगाणिस्तानवर ताबा मिळवला आहे. यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये माजी मुख्यमंत्री आणि पीडीपी अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी केंद्र सरकारला अफगाणिस्तानातून धडा घेण्याच सल्ला दिला आहे. इतकेच नाही तर,जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीची तुलना अफगाणिस्तानसोबत केलेली आहे. यावर मुफ्तींनी केंद्राला इशारा दिला आहे की, आमची परीक्षा घेऊ नका. आमचे मार्ग सुधारणे, परिस्थिती समजून घेणे आणि आमच्या शेजारी काय चालले आहे ते पहा. महाशक्ती असलेल्या अमेरिकेला आपली पिशवी गुंडाळून पळून जावे लागले. तुम्हाला जम्मू-काश्मीरवर चर्चा करण्याची संधी आहे, असेही मुफ्ती केंद्र सरकारला म्हणाल्या.
तालिबानचा भारतासाठी धोका; शिया धर्मगुरूंचे वक्तव्य
अफगाणिस्तानमध्ये तणावपूर्ण वातावरण असून, तालिबान्यांनी पुन्हा दहशतीचा मार्ग अवलंबला आहे. याविषयी भाष्य करतांना शिया धर्मगुरू मौलाना कल्बे जव्वाद यांनी भारताला धोक्याचा इशारा दिला आहे. तालिबान्यांना रोखले नाही तर, भारतासाठी मोठा धोका होऊ शकतो, असा सतर्कचा इशारा त्यांनी दिला आहे. तालिबान हे अमेरिका आणि इस्त्राईलने उभे केलेल्या क्रूर प्राण्यांचे संघटन अशी उपमा त्यांनी दिली आहे. या संघटनेमध्ये माणसे नाहीत तर, क्रूर जनावरे आहेत. काही वर्षांपूर्वीच तालिबान्यांनी पाकिस्तानातील शाळेवर हल्ला करून लहान मुलांचा जीव घेतला होता. यापेक्षा जास्त क्रूरता काय असू शकते, असे मत मौलाना कल्बे जव्वाद यांनी मांडले. तालिबान्यांविरोधात संपूर्ण जग एकत्र यायला हवे. मात्र, त्यांच्याविरोधात जगभरात एकता दिसून येत नाही. त्यांच्या कृत्यांवर वेळीच आवर घालायला हवा. अफगाणिस्तानात सध्याची परिस्थिती खूपच चिंताजनक आहे, असेही त्यांनी निदर्शनास आणून दिले आहे.
COMMENTS