सुरजेवालांसह काँगे्रसच्या पाच नेत्यांचे ट्विटर अकाऊंट निलंबित

Homeताज्या बातम्यादेश

सुरजेवालांसह काँगे्रसच्या पाच नेत्यांचे ट्विटर अकाऊंट निलंबित

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे ट्विटर अकाऊंट तात्पुरते निलंबित केल्यानंतर आता काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांच्यासह काँग्रेसच्या

राष्ट्रीय दर्जा का गेला ? 
राष्ट्रपती पदासाठी मुर्मू यांचा विजय निश्चित !
खा. नीलेश लंके यांचा राजधानीत चक्क रिक्षातून प्रवास

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे ट्विटर अकाऊंट तात्पुरते निलंबित केल्यानंतर आता काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांच्यासह काँग्रेसच्या पाच वरिष्ठ नेत्यांचे ट्विटर अकाऊंट निलंबित करण्यात आले आहे. ही माहिती काँग्रेसकडून देण्यात आली आहे. यामध्ये सुरजेवाला यांच्यासोबत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि माजी केंद्रीय मंत्री अजय माकन, लोकसभेतील पक्ष प्रतोद माणिकम टागोर, आसामचे प्रभारी जितेंद्र सिंह आणि महिला काँग्रेस अध्यक्षा सुष्मिता देव यांचे ट्विटर अकाऊंट निलंबित करण्यात आल्याचे काँग्रेसतर्फे सांगण्यात आले आहे.
दरम्यान, काँग्रेस आणि ट्विटर यांच्यातील संघर्ष वाढत चालला आहे. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांचे अकाऊंट बंद केल्यानंतर आता ट्विटरने काँग्रेसचे अकाऊंट बंद केले आहे. ट्विटर अकाऊंट बंद करण्यात आल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. आमचा लढा सुरूच राहील, असा निर्धार काँग्रेसकडून व्यक्त करण्यात आला आहे. ट्विटर अकाऊंट बंद करण्यात आल्याची माहिती काँग्रेसने फेसबुकच्या माध्यमातून दिली. आमच्या नेत्यांना तुरुंगात टाकण्यात आले, त्यावेळीही आम्ही घाबरलो नाही. मग ट्विटर अकाऊंट बंद केल्याने का घाबरू? आम्ही काँग्रेस आहोत. जनतेचा संदेश आहोत. आम्ही लढत आहोत. लढत राहू,’ असा निश्‍चय काँग्रेसने केला आहे. बलात्कार पीडित मुलीला न्याय देण्याासाठी आवाज उठवणे अपराध असेल, तर हा अपराध आम्ही शंभरवेळा करू. जय हिंद, सत्यमेव जयते, अशी प्रतिक्रिया काँग्रेसनं दिली आहे. दिल्लीत एका नऊ वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याची घटना घडली. बलात्कारानंतर मुलीची हत्या करण्यात आली. या मुलीच्या कुटुंबीयांची राहुल गांधींनी भेट घेतली. या भेटीचा फोटो राहुल यांनी ट्विटरवरून शेअर केला होता. त्यामुळे ट्विटरने राहुल यांचे अकाऊंट लॉक करण्यात आले. राहुल गांधींसोबतच काँग्रेसच्या आणखी काही नेत्यांची अकाऊंट्स देखील ट्विटरकडून बंद करण्यात आली आहेत. यामध्ये रणदीप सुरजेवाला, अजय माकन, सुष्मिता देव यांच्यासह अनेक नेत्यांचा समावेश आहे.

बाळासाहेब थोरात यांचे अकाऊंट ट्विटरकडून लॉक
महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचे ट्विटर अकाऊंट लॉक केले आहे. ट्विटरकडून करण्यात आलेल्या या कारवाईमुळे काँग्रेसकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. ट्विटरच्या नियमांचा भंग केल्या प्रकरणी तुमच्यावर कारवाई करण्यात येत आहे, असे बाळासाहेब थोरात यांचे ट्विटर अकाऊंट लॉक करताना ट्विटरने सांगितले आहे.

COMMENTS