सिगारेट दिली नाही म्हणून टपरी चालकावर तलवारीने प्राणघातक हल्ला

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सिगारेट दिली नाही म्हणून टपरी चालकावर तलवारीने प्राणघातक हल्ला

नगर । प्रतिनिधी अहमदनगर शहरात कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला असून तलवारींसह धारदार शस्त्रांनी हाणामार्यांच्या घटना वाढू लागल्या आहेत. दोन

पत्रकार बाळ बोठेचा शोध घेणे ठरले आव्हानात्मक…
Crime Alert : पत्नीचा खून करून पती झाला फरार…
नगर अर्बन बँकेच्या कर्जखात्यांचे फॉरेन्सिक ऑडीट

नगर । प्रतिनिधी

अहमदनगर शहरात कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला असून तलवारींसह धारदार शस्त्रांनी हाणामार्यांच्या घटना वाढू लागल्या आहेत. दोन दिवसांपुर्वी सावेडीच्या ऍमेझॉन कार्यालयातील धुडगूस, बालिकाश्रम रस्त्यावरील कोयत्याने हाणामार्या या घटनांच्या पाठोपाठ शुक्रवारी (दि.24) पहाटे बसस्थानक परिसरातही तलवारी व धारदार शस्त्राने दोन गटात हाणामार्या झाल्याने शहरात पोलिसांचा वचक राहिला की नाही असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. जुन्या बसस्थानकासमोर असलेल्या सारंग पान टपरी समोर शुक्रवारी (दि.24) पहाटे 1 च्या सुमारास दोन गटात झालेल्या तुफान हाणामारीत तिघे जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर शहरातील दोन वेगवेगळ्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

या हाणामार्या प्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अरबाज अख्तर शेख (वय 24, रा.आशा टॉकीज चौक) याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, शुक्रवारी पहाटे 1 च्या सुमारास आपण आशा टॉकीज चौकात असताना आपला भाऊ फैयाज व त्याचा मित्र इरफान व साजिद शेख हे तेथे आले व त्यांनी आपणास सारंग पान टपरीचे मालक गुल्लूभाई व त्याची दोन मुले सद्दाम व अरबाज तसेच आदम व इतर दोन-तीन लोकांनी शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. याबाबत आपण जाब विचारण्यासाठी गेलो असता अरबाज याने त्याच्या हातातील धारदार वस्तुने आपणावर वार केला. तसेच इतरांनीही लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. जास्त मार लागल्यामुळे आपण प्रथम सिव्हील हॉस्पिटल व नंतर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झालो असल्याचे त्याने फिर्यादीत म्हटले आहे. या फिर्यादीवरुन पोलिसांनी सारंग पान टपरीचे मालक गुल्लूभाई व त्यांच्या मुलांविरुद्ध भा.दं. वि.क. 324, 323, 504, 143, 147, 149 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

दुसरी फिर्याद सय्यद अरबाज शकील याने दिली असून त्यामध्ये म्हटले आहे की, आमची इम्पिरिअल चौकाजवळ सारंग पान टपरी आहे. शुक्रवारी रात्री आपले वडील शकील सय्यद हे पान टपरीवर असताना कुरखान शकील शेख, सादीक शेख, अरबाज शेख, फैयाज शेख हे तेथे आले व त्यांनी वडीलांकडे सिगारेटची मागणी केली. वडिलांनी पोलिसांचा राऊंड चालू असताना तुम्हाला सिगारेट देता येणार नाही, असे सांगितले असता त्याचा राग येवून त्यांनी शिवीगाळ सुरू केली. त्यावेळी आपण व आपला भाऊ सद्दाम तेथे गेलो असता त्यांनी आम्हालाही शिवीगाळ करत ‘तुमच्याकडे पाहून घेतो’ असे सांगून तेथून निघून गेले. त्यानंतर 1.15 वाजता ते पुन्हा मोटारसायकलवर हातात काठ्या व तलवारी घेऊन टपरी जवळ आले व त्यातील शकुरखान शकील शेख याने आपला भाऊ सद्दाम याच्या हातावर तलवारीचा वार केला. 

आपण त्याला सोडवण्यासाठी गेलो असता आपल्या हातावरही तलवारीचा वार करण्यात आला. त्यानंतर आपले वडील, भाऊ व आपणास फैजान शेख, साबीर शेख, शकुर खान आदींनी लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीत आम्ही दोघे भाऊ जखमी झालेलो असून आपला भाऊ सद्दाम हा बेशुद्धावस्थेत आयसीयुमध्ये उपचार घेत आहे. या फिर्यादीवरुन पोलिसांनी विरोधी गटाविरुद्ध भा.दं.वि.क. 326, 324, 323, 504, 506, 34, आर्म ऍक्ट 25/4 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. शहरातील धारदार शस्त्रांचा वापर करुन हाणामार्या झाल्याचे या आठवड्यातील ही चौथी घटना आहे. यातील तीन गुन्हे तोफखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीत तर हा गुन्हा कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडला आहे. शहराच्या सर्वच भागात सशस्त्र हाणामार्या होऊ लागल्याने शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

COMMENTS