सिंघू बॉर्डरवर आणखी एका शेतकर्‍याचा मृत्यू

Homeताज्या बातम्यादेश

सिंघू बॉर्डरवर आणखी एका शेतकर्‍याचा मृत्यू

नवी दिल्ली : दिल्लीच्या सिंघू बॉर्डरवर आज, बुधवारी एका शेतकर्‍याचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. गुरप्रित सिंग असे या शेतकर्‍याचे नाव असू

* अतिरिक्त बिल वसूल करणाऱ्या दवाखान्यांना दणका l पहा LokNews24*
पुणे महापालिकेतील समाविष्ट गावांतील रहिवाशांना दिलासा
माणसाने विनोदी असणं हे जिवंत पणाचे लक्षण; डॉ मिर्झा रफी अहमद बेग

नवी दिल्ली : दिल्लीच्या सिंघू बॉर्डरवर आज, बुधवारी एका शेतकर्‍याचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. गुरप्रित सिंग असे या शेतकर्‍याचे नाव असून तो पंजाबच्या फतेहगड येथील रहिवासी आहे. गुरप्रित सिंग हा जगजित सिंग ढलेवाल आणि बीकेयू सिद्धपूर यांच्या संघटनेशी संबंधीत असून त्याने आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तवला जातोय.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सोनीपत येथील कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उप अधीक्षक वीरेंद्र सिंग म्हणाले, प्राथमिक माहितीनुसार ही आत्महत्या असल्याचे दिसते. चौकशी सुरू करण्यात आली आहे. बीकेयू एकता सिद्धुपूरच्या गुरजिंदर सिंग यांनी सांगितले की, त्यांना सकाळी सहाच्या सुमारास घटनेची माहिती मिळाली आणि त्यांनी गुरप्रीत सिंगला रुग्णालयात नेले, जिथे त्याला मृत घोषित करण्यात आले. सोमवारी गुरप्रीत सिंग गावाला भेट देऊन सिंघू सीमेवर परतला होता. गेल्या दोन दिवसांत शेतकर्‍यांशी साधलेल्या संवादात गुरप्रीत सिंगने कृषी कायद्यांवरील अडथळ्यामुळे नाराज असल्याचा उल्लेख केला आणि एक वर्षाहून अधिक काळ शेतकरी आंदोलने करूनही सरकार त्यांच्या मागण्या ऐकून घेत नाही, असे म्हटले. गुरप्रीत सिंगने मृत्यूपूर्वी कोणतीही चिठ्ठी लिहिलेली नाही. त्याच्या डाव्या हातावर फक्त ‘जिम्मेदार’ हा शब्द लिहिलेला आहे, असे सिंग यांनी यांनी सांगितले. पोलिसांनी सांगितले की, गुरप्रीत सिंगच्या पश्‍चात त्याची पत्नी आणि एक 20 वर्षांचा मुलगा आहे. सध्या शेतकर्‍याचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. या शेतकर्‍याची हत्या की आत्महत्या हे अद्याप समजू शकलेले नाही. कुंडली पोलीस ठाणे दोन्ही बाजूंनी तपास करत असल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी सांगितले. दरम्यान आंदोलनाला एक वर्ष पूर्ण होत असल्याने संयुक्त किसान मोर्चाने 26 नोव्हेंबर रोजी दिल्लीच्या सीमेवर मोठी सभा घेण्याची घोषणा केलीय. आगामी 29 नोव्हेंबरपासून संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू होत असून शेतकर्‍यांचे दररोज 500 ट्रॅक्टर संसदेकडे कूच करणार आहेत. सिंघू सीमेवर मंगळवारी झालेल्या बैठकीत शेतकरी आंदोलनाची पुढील रणनीती ठरविण्यात आली. दरम्यान, वरिष्ठ नेत्यांनी आंदोलन शांततेत आणि शिस्तीने चालवण्याचे मान्य केले.

COMMENTS