सावेडी जॉगिंग ट्रॅक मैदान विविध समस्यांनी ग्रासले

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सावेडी जॉगिंग ट्रॅक मैदान विविध समस्यांनी ग्रासले

अहमदनगर प्रतिनिधी -  शहरातील एकमेव अत्यंत महत्त्वाचे सावेडी जॉगिंग ट्रॅक मैदान आहे. या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक, महिला,युवक हजारोच्या संख्येने व्याया

श्री विशाल गणेश मंदिर व शनी-मारुती मंदिर महाआरती करुन भाविकांसाठी खुले
विश्वस्त पदाच्या माध्यमातून भाविकांची सेवा करण्याची संधी – सौरभ बोरा
डॉ. तनपुरे कारखाना उस गाळप हंगामासाठी सज्ज

अहमदनगर प्रतिनिधी – 

शहरातील एकमेव अत्यंत महत्त्वाचे सावेडी जॉगिंग ट्रॅक मैदान आहे. या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक, महिला,युवक हजारोच्या संख्येने व्यायामासाठी येत असतात परंतु या ठिकाणी कुठलीही सुविधा उपलब्ध करून दिलेली नाही सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे सदर मैदानामध्ये घाणीचे साम्राज्य पसरले आहे 

यामध्ये विशेष म्हणजे सदर ठिकाणी शौचालय उपलब्ध नाही त्यामुळे नागरिकांनाची गैरसोय निर्माण झाली.सदर ठिकाणी पथदिवे नसल्याने अंधाराचे साम्राज्य पसरले आहे यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याच बरोबर मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी मैदानामध्ये साचले जाते व मैदानात मोठ्या प्रमाणात गवत वाढले आहे त्यामुळे सदर मैदानात डासाची निर्मिती मोठ्या प्रमाणात होत आहे 

त्यामुळे नागरिकांना साथीच्या आजारांना सामोरे जावे लागते यासाठी महापालिकेने सदर जॉगिंग ट्रॅक मैदानामध्ये लक्ष घालून विविध समस्यांचे निराकरण करावे अशी मागणी मनपा आयुक्त शंकर गोरे यांच्याकडे निवेदनाद्वारे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा यांनी केली आहे यावेळी शुभम तारळकर,अक्षय मिरपगार,अमर सैंदर, अथर्व घुले,ऋषीकेश खटावकर,बबलु गुलदगड,विक्की मोरे,सुरज ठोकळ,  ऋग्वेद कुलकर्णी,गणेश चापे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने शहरातील खड्ड्यांची संदर्भात लक्षवेधी आंदोलन केले होते परंतु सदर आंदोलनानंतर मनपा प्रशासनाला जाग आली नाही तरी लवकरात-लवकर हा त्यांचा प्रश्न मार्गी लावा अन्यथा पुन्हा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडू असा इशारा सुमित वर्मा यांनी दिला.

COMMENTS