सावेडी उपनगर भागातील श्रीराम चौक ते पुणे बस सेवेचा शुभारंभ

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सावेडी उपनगर भागातील श्रीराम चौक ते पुणे बस सेवेचा शुभारंभ

अहमदनगर प्रतिनिधी-  नगर शहराच्या प्रलंबित विकास कामाला चालना दिली आहे त्यामुळे उपनगराच्या विकासाला गती मिळाली आहे.सावेडी उपनगर हे शहराचे सर्वात मो

Ahmednagar : दरोडे टाकून लूटमार करणारी टोळी गजाआड (Video)
नवरात्र उत्सवात केडगाव देवीच्या मंदिर परिसरात स्टॉल लावण्यास परवानगी द्यावी
10 हजार थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडीत

अहमदनगर प्रतिनिधी- 

नगर शहराच्या प्रलंबित विकास कामाला चालना दिली आहे त्यामुळे उपनगराच्या विकासाला गती मिळाली आहे.सावेडी उपनगर हे शहराचे सर्वात मोठे उपनगर झाले आहे या ठिकाणी मोठी लोक वस्ती निर्माण झाली आहे.नागरिकांच्या दळनवळनाचा प्रश्नही तितकाच महत्त्वाचा आहे 

यासाठी राज्य परिवहन महामंडळाची बस सेवा सावेडीतील श्रीराम चौक,एकविरा चौक,भिस्तबाग चौक,प्रोफेसर कॉलनी चौक,प्रेमदान चौक,पत्रकार चौक, तारकपूर ते पूना बससेवा सुरू केली आहे.कारण नगर शहरातून दाररोज नागरिक आपल्या कामासाठी,व्यवसायासाठी, शिक्षणासाठी व आरोग्यसेवा साठी जात असतात सावेडी उपनगरातील नागरिकांची दळणवळणाची गैरसोय होऊ नये साठी दररोज परिवहन महामंडळाची बस सेवा सुरू केली आहे.ही बस सेवा सुरू करण्यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे वैभव ढाकणे यांनी पाठपुरावा केला असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केले.

आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून राज्य परिवहन महामंडळाची श्रीराम चौक ते पुणे बस सेवेचा शुभारंभ करण्यात आला यावेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष माणिकराव विधाते,नगरसेवक विनीत पाऊलबुद्धे,मा.नगरसेवक निखिल वारे,सुनील त्रिंबके,बाळासाहेब पवार, विद्यार्थी संघटनेचे शहर जिल्हाध्यक्ष वैभव ढाकणे, अजिंक्य बोरकर,एस.टीचे विभाग नियंत्रक विजय गीते,डेपो मॅनेजर आघाव, शारदाताई लगड,संतोष ढाकणे,गणेश गोरे,राहुल सांगळे,बंटी हिवाळे,योगेश ठुबे,सतीश बारस्कर,शिवाजी पालवे,योगेश पिंपळे,शामराव गोरे,आसाराम निमसे,थोटे काका,राहुल घाणेकर,गणेश उभेदळ, रवी नाईकवाडे,प्रज्वल सोरटे तसेच परिसरातील नागरिक यावेळी उपस्थित होते.

एस.टीचे विभाग नियंत्रक विजय गीते म्हणले की,आ.संग्राम जगताप यांनी राज्य परिवहन महामंडळाची बस सेवा सावेडी उपनगरातून सुरू व्हावी यासाठी आमच्याकडे पत्रव्यवहार केला होता त्या पत्राची दखल घेऊन आज पासून श्रीराम चौकातून सकाळी सात वाजता उपनगरातील विविध भागाच्या मार्गी ही बस पुणे येथे 11 वाजता गेल्या नंतर पुन्हा ही बस पुणे येथून नगर कडे रवाना होऊन परत श्रीराम चौकामध्ये येणार आहे. 

यावेळी प्रोफेसर कॉलनी चौकातील सुप्रभात ग्रुपच्यावतीने बस सेवा सुरू केल्या बद्दल आमदार संग्राम जगताप यांचे आभार मानण्यात आले यावेळी चालक-वाहक यांचा सत्कार देखील करण्यात आला

COMMENTS