सामाजिक उपक्रमाने महावीर जयंती साजरी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सामाजिक उपक्रमाने महावीर जयंती साजरी

भगवान महावीर जयंती नगरमध्ये साधेपणाने व सामाजिक उपक्रमांनी साजरी झाली.

केलीफोर्निया येथील साई भक्तांचे साई चरनी 41 लाख रुपये दान
महात्मा फुले कृषि विद्यापीठात सॉफ्टवेअरचे दोन आठवड्याचे प्रशिक्षण संपन्न
महादजी शिंदे विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा मेळावा उत्साहात

अहमदनगर/प्रतिनिधी- भगवान महावीर जयंती नगरमध्ये साधेपणाने व सामाजिक उपक्रमांनी साजरी झाली. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर होलसेल व्यापारी कापड व गारमेंट असोसिएशनच्यावतीने बुथ हॉस्पिटल येथे रुग्णांसाठी बेडशीट भेट देण्यात आले तर जैन युथ आयकॉन ग्रुपच्यावतीने मास्क, सॅनिटायझर, फुडकिटचे वाटप करून कोरोना महामारीची जनजागृती करण्यात आली.

 सध्या सर्वत्र करोनाचे थैमान चालू असून परिस्थिती अतिशय गंभीर झाली आहे. राज्यात कडक लॉकडाऊनही लागू करण्यात आला आहे. या पार्श्‍वभूमीवर सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देत नगरमध्ये यंदा भगवान महावीर जयंती निमित्त निघणारी मिरवणूक रद्द करण्यात आली आहे. जैन बांधवांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून भगवान महावीर जयंती घरीच थांबून साजरी करावी तसेच भगवान महावीर स्वामींच्या शिकवणुकीप्रमाणे समाजातील गरजूंना शक्य ती मदत करावी, गोशाळांना मदत करावी, असे आवाहन कापड बाजार जैन मंदिराचे अध्यक्ष सुभाष मुथा यांनी केले होते. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला.

बुथ रुग्णालयाला बेडशीट भेट

महावीर जयंतीनिमित्त येथील होलसेल व्यापारी कापड व गारमेंट असोसिएशनच्यावतीने बुथ हॉस्पिटल येथे रुग्णांसाठी बेडशीट भेट देण्यात आले. हॉस्पिटलचे देवदान कळकुंबे यांच्याकडे हे बेडशीट देण्यात आले. यावेळी दीपक कासवा, सतीश कुलकर्णी, घनश्याम आहुजा, मनोज लोढा, नितेश आहुजा, विजय पितळे, आनंद कटारिया, सागर काबरा, दिनेश बोरा, निखील गांधी उपस्थित होते. यावेळी कासवा म्हणाले की, भगवान महावीर यांनी जगाला दिलेल्या सत्य व अहिंसेच्या तत्त्वावर असोसिएशनचे पदाधिकार्‍यांंनी सामाजिक कार्याची भावना ठेवत एक आधार देण्याचे काम म्हणून बुथ हॉस्पिटल येथे प्रत्येक कोरोना पेशंटसाठी बेडशीटचे वाटप करण्यात आले.

महामारीची जनजागृती

महावीर जयंतीनिमित्त जैन युथ आयकॉन ग्रुपच्यावतीने मास्क, सॅनिटायझर, फुडकिटचे वाटप करून कोरोना महामारीची जनजागृती करण्यात आली. नगर शहरातील बुथ हॉस्पिटल व जिल्हा रुग्णालय येथील कोरोना पेशंटला व अहमदनगर महापालिकेच्या कर्मचार्‍यांना तसेच शहरांमध्ये चौका-चौकातील पोलीस कर्मचार्‍यांना मास्क, सॅनिटायझर, फुडकिटचे वाटप करून कोरोना महामारीची जनजागृती करण्यात आली. यावेळी शुभम मेहेर, सफल जैन, आदित्य श्रीमाळ, निखील संचेती, अक्षय सुराणा, शुभम गुगळे, प्रतीक गांधी, प्रसाद चाणोेदिया, आयुष कटारिया, सार्थक चोपडा, स्वप्निल चंगेडिया, तेजस संचेती, अमित मेहेर, वर्धमान पितळे उपस्थित होते. यावेळी जैन म्हणाले की भगवान महावीर यांनी जगाला दिलेल्या सत्य व अहिंसेच्या तत्त्वावर जैन युथ आयकॉन ग्रुपचे युवक सामाजिक कार्य करीत आहे. यातून वंचितांना आधार देण्याचे काम करत असून विविध उपक्रम राबवले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

घरोघरी झाला जप

कोरोनामुळे सरकारने गर्दी टाळण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे आताच्या परिस्थितीत प्रत्येकानेच उत्स्फूर्तपणे शासन नियमांचे पालन करण्याची नितांत गरज असल्याने यंदा नगरमध्ये मिरवणूक न काढण्याचा निर्णय कापड बाजार जैन मंदिराचे अध्यक्ष सुभाष मुथा यांनी जाहीर केला होता व या काळात योग्य सोशल डिस्टन्सिंग राखून गरजवंताना मदतीचा हात द्यावा, गोसेवा करावी आणि घरीच महावीर स्वामींचे नामस्मरण करावे, नवकार जाप, पूजा अर्चा करावी, असे आवाहन केले होते. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला.  सकल जैन समाजाद्वारे नगरमध्ये तीस वर्षांपासून भगवान महावीर जयंती भव्यदिव्य पद्धतीने साजरी करण्याची परंपरा आहे. सिमंधर स्वामी मंडळाचे दांडिया पथक, जैन ढोल पथक, महिलांचा सहभाग, चौक सजावट, मिरवणूक मार्गावर रांगोळी, साधु-साध्वींचे भगवान महावीर यांच्या जीवनावरील व्याख्यान असे अनेकविध कार्यक्रम होत असतात. मात्र, यंदा भगवान महावीर मनामनात, जयंती घराघरात’ हा मंत्र ठेवण्यात आला होता व नगर शहर आणि जिल्ह्यातील जैन बांधवांनी हा मंत्र जपतच घरी सुरक्षित राहून महावीर जयंती साजरी करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यालाही प्रतिसाद मिळाला. यानिमित्ताने प्रत्येकाने समाजासाठी योगदान देण्याचा प्रयत्न करण्याचे आवाहन हडको जैन मंदिराचे विश्‍वस्त सुधीर मेहता यांनी केले आहे.

फोटो ओळी-1

महावीर जयंतीनिमित्त येथील होलसेल व्यापारी कापड व गारमेंट असोसिएशनच्यावतीने बुथ हॉस्पिटल येथे रुग्णांसाठी बेडशीट भेट देण्यात आले.

फोटो ओळी-2

महावीर जयंतीनिमित्त जैन युथ आयकॉन ग्रुपच्यावतीने मास्क, सॅनिटायझर, फुडकिटचे वाटप करून कोरोना महामारीची जनजागृती करण्यात आली.

2 ईींंरलहाशपीीं

COMMENTS