सामंजश्यानी वाद मिटविल्यास समाजात शांतता राहते;न्या.वाडकर

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सामंजश्यानी वाद मिटविल्यास समाजात शांतता राहते;न्या.वाडकर

देवळाली प्रवरा /प्रतिनिधी         "कोणताही तंटा सामंजश्यानी आपसात मिटविल्यास मुख्य गोष्टी कडे लक्ष देता येते,सम

भातकुडगाव फाटा कडकडीत बंद
अकोलेतील 15 शाळांना संगणक संच प्रदान
…तर, नवनीत राणांनी महिला आयोगाकडे तक्रार करावी : रुपवते

देवळाली प्रवरा /प्रतिनिधी 

       “कोणताही तंटा सामंजश्यानी आपसात मिटविल्यास मुख्य गोष्टी कडे लक्ष देता येते,समाजात शांतता राहू शकते,न्यायालयीन प्रक्रीयेत शासनाने दिलेल्या सर्व पर्याय व सुविधाचा विचार करण्यात यावा,” असे मत राहुरी च्या मुख्य न्यायाधीश आसावरी वाडकर यांनी व्यक्त केले.

       देवळालीप्रवरा नगरपरिषदेच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभाग्रहात तालुका विधी सेवा समिती च्या वतीने कायदेशीर शिबीर आयोजित केले होते, त्यावेळी त्यावेळी न्या.वाडकर बोलत होत्या. यावेळी नगराध्यक्ष सत्यजित कदम, मुख्याधिकारी स्नेहा भोसले,उपनगराध्यक्ष आण्णासाहेब चोथे, न्यायधीश माया मथुरे  मान्यवर उपस्थित होते.

             न्या.वाडकर पुढे म्हणाल्या की, वाद मिटविण्यासाठी वैकल्पीक पर्याचा वापर करावा यामुळे वेळ व पैसा वाचणार आहे.लोकन्यायालय यामध्ये वाद मिटविले पाहिजे.लवकरात वलकर न्याय मिळविता येईल कायदे विषयक ज्ञान जागृती झाली पाहिजे.असे न्या.वाडकर यांनी सांगितले.

            यावेळी जेष्ठ वकील एस.जी.देशमुख यांनी कायदे विषयक माहिती दिली. अँड.सविता ठाणगे यांनी प्रास्ताविक केले.सहा.प्रकल्प अधिकारी सुनील गोसावी यांनी सूत्रसंचालन केले. तर शेवटी वकील संघाचे उपाध्यक्ष अड्.एम.बी.देशमुख यांनी आभार मानले.

     कार्यक्रमास नगरसेविका सौ.सुजाता कदम,सौ.अंजली कदम,सौ.संगीता चव्हाण,सौ.प्रितीताई कदम,वकील संघाचे एम.बी.शेळके,जी.बी.रसाळ,विशाल होले,संभाजी कदम,सविता गांधले,प्रशासकीय अधिकारी बन्शी वाळके आदी उपस्थित होते.

COMMENTS