Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सातारा जिल्ह्यात कोरोनाचा महापूर; नवीन 1016 रुग्णांची नोंद; उपचारादरम्यान 10 बाधित रुग्णांचा मृत्यू

सातारा जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 1016 रुग्णांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. तसेच विविध ठिकाणी उपचार घेत असलेल्या 10 बाधित रुग्णांचा मृत्यू झाला.

दिल्ली – बंगळूरू इंडिगो विमानात मद्यधुंद प्रवाशाचा धिंगाणा
संविधानाने दिलेला अधिकार बजावण्यासाठी आलोय – राज्यपाल
भाजपमध्ये 40 वर्ष असताना चांगला, राष्ट्रवादीकडं गेलो की वर्षात ईडी लावता:एकनाथ खडसे | LOKNews24

सातारा /प्रतिनिधी : सातारा जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 1016 रुग्णांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. तसेच विविध ठिकाणी उपचार घेत असलेल्या 10 बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेले 498 रुग्ण कोरोना मुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. 

उपचारादरम्यान 10 बाधित रुग्णांचा मृत्यू

स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील दौंड, ता. दौड, जि. पुणे येथील 65 वर्षीय पुरुष, बावधन, ता. वाई येथील 60 वर्षीय पुरुष, वाई येथील 40 वर्षीय पुरुष, राजापूर, ता. खटाव येथील 78 वर्षीय महिला, सातारा येथील 82 वर्षीय पुरुष, मेढा, ता. जावली येथील 77 वर्षीय पुरुष व खासगी हॉस्पीटलमध्ये बुधवार पेठ, ता. फलटण येथील 65 वर्षीय पुरुष, बोडकेवाडी, ता. फलटण येथील 59 वर्षीय पुरुष, तांबवे, ता. कराड येथील 45 वर्षीय पुरुष, घनसोळी, ता. जि. ठाणे येथील 56 वर्षीय पुरुष अशा एकूण 10 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

…………..

COMMENTS