साई दर्शनाच्या वेळेत कपात

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

साई दर्शनाच्या वेळेत कपात

राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य सरकारने नवीन मार्गदर्शक सूचना केल्या असून भाविकांना साईंच्या दर्शनासाठी समाधी मंदिर सकाळी सव्वासात ते रात्री पावणेआठ यावेळेत खुले राहणार आहे.

नेवासा शहरातील नागरी समस्यांविरोधात उपोषण
स्वामी लखनगिरी महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळ्याचे आयोजन
काकडे कुटुंबियांकडून यशस्वी उद्योजकांचा सन्मान

शिर्डी/प्रतिनिधीः राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य सरकारने नवीन मार्गदर्शक सूचना केल्या असून भाविकांना साईंच्या दर्शनासाठी समाधी मंदिर सकाळी सव्वासात ते रात्री पावणेआठ यावेळेत खुले राहणार आहे. साईप्रसादालय हे सकाळी दहा ते रात्री साडेसात  यावेळेत सुरू राहील. 

शासनाच्या आदेशान्वये १६ नोव्हेंबर पासून साईबाबांचे समाधी मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी काही अटी/शर्तींवर खुले करण्यात आलेले आहे. त्यांअनुषंगाने  साईबाबा मंदिरात गर्दी होवू नये, म्हणून साई संस्थानच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. सध्या पुन्हा राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य शासनाने नवीन मार्गदर्शक सूचना केल्या असून त्यानुसार रात्री आठ ते सकाळी सात या  यावेळेत संपूर्ण राज्यात जमावबंदी लागू करण्यात आलेली आहे. त्यामुळे साईभक्तांना दर्शनासाठी साईबाबांचे समाधी मंदिर सकाळी सव्वासात ते रात्री  पावणेआठ यावेळेत खुले राहणार असून रात्री साडेदहा  होणारी ची शेजारती व पहाटे साडेचारची काकड आरती नेहमीप्रमाणे होईल; परंतु भाविकांना प्रवेश दिला जाणार नाही.

COMMENTS