Homeमहाराष्ट्रसातारा

सांगली जिल्ह्यात 15 एप्रिल पर्यंत लॉकडाऊनला मुदतवाढ

सांगली जिल्ह्यातील लॉकडाऊनची मुदत दि. 31 मार्च 2021 रोजीचे रात्री 12 वाजेपर्यंत वाढविण्यात आली होती.

शेती क्षेत्रामध्ये आधुनिकता आणली पाहिजे : खा. शरद पवार
भीषण अपघात; अपघातात रिक्षाचालकाचा जागीच मृत्यू | LOKNews24
कर्मवीर बहुजनांच्या शिक्षणाचे आधारवड ः आ.आशुतोष काळे

सांगली / प्रतिनिधी : सांगली जिल्ह्यातील लॉकडाऊनची मुदत दि. 31 मार्च 2021 रोजीचे रात्री 12 वाजेपर्यंत वाढविण्यात आली होती. राज्य शासनाच्या 27 मार्च 2021 च्या आदेशान्वये त्यांच्याकडील 30 सप्टेंबर 2020, दि. 14 ऑक्टोंबर 2020 व दि. 15 मार्च 2021 च्या आदेशांना दि. 15 एप्रिल 2021 रोजीचे रात्री 12 वाजेपर्यंत मुदत वाढ करण्यात आली आहे. तसेच वाढती कोरोना रुग्ण संख्या पाहता काही प्रतिबंध घालण्यात आले आहेत. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी राज्य शासनाकडील आदेशान्वये लॉकडाऊनला दि. 15 एप्रिल पर्यंत मुदत वाढ केली आहे. 

जिल्ह्यात रात्रीचे 8.00 वाजलेपासून ते सकाळी 7.00 पर्यंत 5 पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई केली आहे. मास्क परिधान न केलेल्या व्यक्तीला 500 रूपयेा दंड आकारला जाईल. सार्वजनिक ठिकाणी  थुंकल्यास 1 हजार रूपये इतका दंड आकारला जाईल. सर्व सिनेमा हॉल / मॉल्स / सभागृह / रेस्टॉरंट रात्री 8.00 वाजलेपासून ते सकाळी 7.00 पर्यंत बंद राहतील. घरपोच सेवा व घेवून जाणेस ची सेवा संबंधित आस्थापनांच्या नियमित वेळेनुसार सुरू ठेवण्यास परवानगी राहील. 

सामाजिक / सांस्कृतिक / राजकीय / धार्मिक कार्यक्रम प्रतिबंधित असतील. या आदेशाचे उल्लंघन झाल्यास आपत्ती कायद्याने निश्‍चित केलेला दंड व कायदेशिर कारवाई केली जाईल. लग्न कार्यासाठी 50 व्यक्ती, अंत्यसंस्कारासाठी 20 व्यक्तींना परवानगी देण्यात आली आहे. 

गृह अलगीकरणास पुढील निर्बंधांसह परवानगी असेल. गृह अलगीकरण होणारी व्यक्ती ज्या वैद्यकीय व्यावसायिकाच्या पर्यवेक्षणाखाली उपचार घेणार आहे त्याची माहिती स्थानिक वैद्यकीय अधिकारी व स्थानिक स्वराज्य संस्था यांना देणे संबंधितावर बंधनकारक असेल. कोविड-19 रुग्णास गृह अलगीकरणाचा शिक्का मारण्यात यावा. सरकारी कार्यालयांमधील गर्दी कमी करण्यासाठी, लोकप्रतिनिधीं व्यतिरीक्त, अतिमहत्वाची कामे नसलेल्या अभ्यागतांना शासकीय कार्यालयात येण्यास परवानगी असणार नाही. सार्वजनिक वाहतुकीस अटी व शर्तींचा आधारे परवानगी देण्यात आली आहे. या व्यतिरिक्त यापूर्वी आदेशाने बंदी अथवा सूट देण्यात आलेल्या क्रिया / बाबी कायम राहतील. सूट देण्यात आलेल्या आस्थापनांनी, शासनाने त्या-त्या विभागासाठी / आस्थापनांसाठी नेमून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे बंधनकारक राहील. हा आदेश दि. 28 मार्च रोजीचे 00.01 वाजल्यापासून दि. 15 एप्रिल 2021 रोजीचे 24.00 वाजेपर्यंत अंमलात राहणार असल्याचेही यावेळी जाहिर करण्यात आले आहे. 

COMMENTS