सह्याद्री कारखान्यावर उद्यापासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे धरणे आंदोलन

Homeमहाराष्ट्रसातारा

सह्याद्री कारखान्यावर उद्यापासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे धरणे आंदोलन

एक रकमी एफआरपी बाबत 25 तारखेला होणार्‍या सहकार मंत्री बाळासाहेब पाटील चेअरमन असणार्‍या सह्याद्री सहकारी साखर कारखान्यावरती स्व. पी. डी.

भीषण अपघात; 2 कंटेनर दरीत कोसळले 
कर्जत- जामखेडमधील लोकांचे व्यक्तिस्वातंत्र्य धोक्यात.. खा. सुजय विखे
’माझे पुणे, स्वच्छ पुणे’ अभियानाचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

इस्लामपूर / प्रतिनिधी : एक रकमी एफआरपी बाबत 25 तारखेला होणार्‍या सहकार मंत्री बाळासाहेब पाटील चेअरमन असणार्‍या सह्याद्री सहकारी साखर कारखान्यावरती स्व. पी. डी. पाटील यांच्या पुतळ्यासमोर माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटना बेमुदत धरणे आंदोलन करणार आहे. त्यासंदर्भात आज कारखान्याचे कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते अ‍ॅड. एस. यु. संदे, सांगली जिल्हा अध्यक्ष पोपटराव मोरे, सातारा पक्ष जिल्हाध्यक्ष देवानंद पाटील, जिल्हा उपाध्यक्ष संघटना दादासाहेब यादव, तालुकाध्यक्ष प्रमोदसिंह जगदाळे, कराड दक्षिण तालुका अध्यक्ष रामचंद्र साळुंखे, रवीकिरण माने, विकास पाटील, जगन्नाथ भोसले, संतोष शेळके, बाळासो जाधव, राजेंद्र पाटील, तुकाराम सरगर, अजमुद्दिन मुजावर यासह संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

COMMENTS