सहा वर्षाच्या मुलाचा लिफ्टच्या खड्ड्यात पडून मृत्यू .

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सहा वर्षाच्या मुलाचा लिफ्टच्या खड्ड्यात पडून मृत्यू .

सहा वर्षाच्या मुलाचा लिफ्टच्या खड्ड्यात पडून मृत्यू वेदांत जाधव असे या चिमुकल्याचे नाव

 एका सहा वर्षीय मुलाचा लिफ्टच्या खड्ड्यात पडून मृत्यू झाला . डोंबिवली(Dombivli)तील सगरली(Sagarli) येथील विघ्नहर्ता( Vighnahartā) इमारतीच्या तळमज

 गोयकरवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस इंटरक्टिव पॅनल भेट
रमाई घरकुल आवास योजनेचा कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर वंचितचे अजय सरवदे यांच्या प्रयत्नांना यश
महामार्गावरील पुलाच्या खड्ड्यात पुन्हा अपघात

 एका सहा वर्षीय मुलाचा लिफ्टच्या खड्ड्यात पडून मृत्यू झाला . डोंबिवली(Dombivli)तील सगरली(Sagarli) येथील विघ्नहर्ता( Vighnahartā) इमारतीच्या तळमजल्यावर राहणारा वेदांत जाधव (Vedanta Jadhav)हा सहा वर्षांचा मुलगा घरा जवळील सात मजली इमारतीतील लिफ्टच्या खड्ड्यात पडून मृत्यू पावल्याची घटना घडली आहे .नेहमीच वेदांत (Vedanta) या इमारतीमध्ये खेळण्यासाठी जात होता . नेहमी प्रमाणे तो या इमारतीत खेळायला गेला पण बराच वेळ झाला तो दिसला नाही म्हणून घरच्यांनी शोधाशोध सुरू केली . त्या दरम्यान थोड्यावेळाने लिफ्टच्या खड्ड्यात त्याचा मृतदेह दिसला . या खड्ड्यात पडलेला बॉल काढण्यासाठी हा मुलगा त्या खड्ड्यात गेला असावा , असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे .या घटने नंतर परिसरात शोककळा पसरली आहे .सध्या मानपाडा पोलीस(Manpada Police) घटनास्थळी दाखल होत या चिमुकल्याचा  मृत्यू कशाने झाला याचा तपास करीत आहे.

COMMENTS