सहा महिन्यापूर्वी उभारलेल्या प्लांटमध्ये ऑक्सिजनच नाही!

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सहा महिन्यापूर्वी उभारलेल्या प्लांटमध्ये ऑक्सिजनच नाही!

महापालिकेच्या कुर्ला येथील भाभा रुग्णालयात सहा महिन्यांपूर्वी ऑक्सिजन साठवण्यासाठी प्लांट उभारण्यात आलाच मात्र अद्याप या प्लांटमधील टाक्यांमध्ये ऑक्सिजन साठवण्याचे काम सुरू झालेले नाही.

2500 शिक्षकांचा ऑनलाईन परीक्षेवर बहिष्कार
पारनेरला देणार मुळा धरणातून पाणी : उपमुख्यमंत्री पवारांची घोषणा
परमबीरविरोधात दहा कोटीची लाच मागितल्याचा आरोप

मुंबई/प्रतिनिधीः महापालिकेच्या कुर्ला येथील भाभा रुग्णालयात सहा महिन्यांपूर्वी ऑक्सिजन साठवण्यासाठी प्लांट उभारण्यात आलाच मात्र अद्याप या प्लांटमधील टाक्यांमध्ये ऑक्सिजन साठवण्याचे काम सुरू झालेले नाही. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत या रुग्णालयातही ऑक्सिजनचा तुटवडा भासू लागल्यानंतर महापालिकेने प्रशासनाचे डोळे उघडले आहेत. 

 ऑक्सिजनचा तुटवडा भासू लागल्याने मागील आठवड्यात पालिकेच्या मुंबईतील विविध रुग्णालयांतील 168 रुग्णांना अन्य रुग्णालये व कोविड सेंटरमध्ये हलवले. यामध्ये कुर्ला येथील भाभा रुग्णालयातील 35 रुग्णांचाही समावेश होता. या पार्श्‍वभूमीवर या रुग्णालयातील ऑक्सिजन पुरवठ्याचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. रुग्णालयात गेल्या वर्षी ऑक्सिजन प्लांट उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी दोन साठवण टाक्या बसवण्याचे काम सुरू करण्यात आले होते. 250 जम्बो सिलिंडर भरतील इतकी या टाक्यांची क्षमता असून पंधरा दिवस पुरेल इतका ऑक्सिजन साठवून ठेवता येऊ शकतो. सहा महिन्यांपूर्वी हा प्लांट उभारून तयार आहे; मात्र अद्याप तो कार्यान्वित करण्यात आलेला नाही, याकडे सामाजिक कार्यकर्ते अनिल गलगली यांनी र्लीशपालिकेचे लक्ष वेधले आहे. ऑक्सिजनची तातडीची गरज असताना प्लांट तयार असूनही वापरात येत नसल्याची तक्रार गलगली यांनी र्लीशपालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्याकडे केली आहे. दरम्यान कुर्ला येथील शिवसेनेचे आमदार मंगेश कुडाळकर यांनी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. उषा शर्मा यांची भेट घेऊन या प्रकरणी चर्चा केली. महापालिकेने मुंबईतील 12 रुग्णालयांमध्ये नवीन ऑक्सिजन प्लांट उभारण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यासाठी सुमारे 90 ते 100 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. या नियोजनात कुर्ला भाभा रुग्णालयाचाही समावेश आहे. या प्रकल्पाची क्षमता आणखी वाढवली जाणार असल्याने तूर्त या प्रकल्पाचा अभ्यास केला जात आहे, अशी माहिती महापालिकेच्या वतीने देण्यात आली.

पाच दिवसांत प्रारंभ

रुग्णालयाच्या अधीक्षक डॉ. उषा शर्मा यांनी पालिकेच्या यांत्रिकी आणि विद्युत विभागाचे प्रमुख अभियंता कृष्णा पेरेकर यांच्याशी चर्चा करून येत्या पाच दिवसांत हा प्रकल्प सुरू करण्यात येणार असल्याचे आश्‍वासन आमदार कुडाळकर यांना दिले आहे, अशी माहिती गलगली यांनी दिली.

COMMENTS