सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सह.साखर कारखान्याचा ऊस गळीत हंगामाचा शुक्रवारी शुभारंभ

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सह.साखर कारखान्याचा ऊस गळीत हंगामाचा शुक्रवारी शुभारंभ

संगमनेर (प्रतिनिधी)  सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सह.साखर कारखान्याचा सन २०२१ - २०२२ या  ऊस गळीत हंगामाचा शुभारंभ विजया दशमीच्या शुभमुहुर्तावर

शक्ती कायदा लवकर लागू करण्यात यावा
शिंगणापूरची विकासाची घोडदौड अशीच सुरू राहणार ः विवेक कोल्हे
संजीवनीच्या 100 टक्के निकालाची  परंपरा कायम

संगमनेर (प्रतिनिधी) 

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सह.साखर कारखान्याचा सन २०२१ – २०२२ या  ऊस गळीत हंगामाचा शुभारंभ विजया दशमीच्या शुभमुहुर्तावर शुक्रवार दिनांक १५ ऑक्टोबर २०२१ रोजी सकाळी ९ वाजता महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात व सौ.कांचनताई बाळासाहेब थोरात यांच्या शुभहस्ते व आमदार डॉ.सुधीर तांबे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि कारखान्याचे चेअरमन बाबासाहेब ओहोळ यांचे अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला असल्याची माहिती कारखान्याचे उपाध्यक्ष संतोष हासे यांनी दिली आहे.

महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात सर्वाधिक भाव देणारा सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सह.साखर कारखाना देशातील अग्रगण्य कारखाना म्हणून ओळखला जात आहे. या कारखान्याने स्व.भाऊसाहेब थोरात यांची कडवी शिस्त, काटकसर,पारदर्शकता व उत्कृष्ट व्यवस्थापन आणि नामदार बाळासाहेब थोरात यांच्या कुशल मार्गदर्शनामुळे या साखर कारखान्याने देशात आदर्श निर्माण केला आहे.

या ऊस गळीत हंगाम शुभारंभाप्रसंगी ज्येष्ठ नेते बाजीराव पा.खेमनर,अ‍ॅड.माधवराव कानवडे, सौ.दुर्गाताई तांबे,सत्यजीत तांबे,रणजितसिंह देशमुख,इंद्रजितभाऊ थोरात,शिवाजीराव थोरात,सौ.सुनंदाताई जोर्वेकर,सौ.मिराताई शेटे,शंकर पा.खेमनर,लक्ष्मणराव कुटे,विश्वासराव मुर्तडक,अमित पंडित,रामहरी कातोरे, हौशीराम सोनवणे,राजेंद्र गुंजाळ, भाऊसाहेब एरंडे,राजेंद्र कडलग, अ‍ॅड. सुहास आहेर,सुधाकर रोहम, आरीफभाई देशमुख,आनंद वर्पे, सौ.निर्मलाताई गुंजाळ, सौ.अर्चनाताई बालोडे,प्रा।बाबा खरात,निखील पापडेजा,गौरव डोंगरे, सुरेश थोरात,सुरेश झावरे,माधवराव हासे, सुभाष सांगळे आदि मान्यवर उपस्थित राहणार आहे.

तरी या कार्यक्रमासाठी सर्व सभासद, ऊस उत्पादक व शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन कारखान्याचे सर्व संचालक मंडळ व कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केले आहे.

COMMENTS