नगर :योग विद्या धाम अहिल्यानगरच्या वतीने गेल्या ४० वर्षापासून सर्व वयोगटातील लोकांसाठी विविध योग वर्ग घेण्यात येतात. तसेच विकारांनुसार देखील विविध वि
नगर :
योग विद्या धाम अहिल्यानगरच्या वतीने गेल्या ४० वर्षापासून सर्व वयोगटातील लोकांसाठी विविध योग वर्ग घेण्यात येतात. तसेच विकारांनुसार देखील विविध विकारांसाठी विविध विशेष योग वर्ग घेतले जातात.
आता सर्व विकारग्रस्तांसाठी परिणामकारक व उपयुक्त असा योग संजीवन वर्ग सुरू होत आहे. अशी माहिती योग विद्या धामचे कार्याध्यक्ष श्रीयुत सुभाष पांढरे यांनी दिली. विकार कोणताही असो सर्व प्रकारच्या विकारांवर या वर्गातल्या प्रक्रिया अत्यंत लाभदायक ठरतात आणि या अभ्यासातील आसने सर्वांनाच जमतात असा अनुभव आहे.
वर्गाची वेळ : सोमवार दिनांक ७ ते ३१ जुलै दररोज सकाळी ७ ते ८ व दुपारी ४ ते ५
स्थळ : योग भवन, कुष्ठधाम रोड, ज्ञानेश्वर ड्रायव्हिंग स्कूल जवळ
विशेषतः वृद्धांना, ज्यांना असे वाटते की आपल्याला काहीच जमणार नाही, त्यांना देखील ही आसने करता येतील. त्यामुळे प्रौढ, वृद्ध व अतिवृद्धांनी या संधीचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सुंदर गोरे यांनी केले


COMMENTS