सर्वांत मोठ्या लसीकरण केंद्रावर तुटवडा

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सर्वांत मोठ्या लसीकरण केंद्रावर तुटवडा

कोरोना प्रतिबंधित लसीचा तुटवडा राज्यात मोठ्या प्रमाणात जाणवू लागला आहे.

डॉ. दाभोळकर हत्येप्रकरणी दोघांना जन्मठेप
ओबीसी नेत्यांचे खून करण्यामागे आर‌एस‌एस का?
सुप्रसिद्ध बाबुलनाथ मंदिरातील शिवलिंगाला भेग

मुंबई/प्रतिनिधीः कोरोना प्रतिबंधित लसीचा तुटवडा राज्यात मोठ्या प्रमाणात जाणवू लागला आहे. मुंबईतील सर्वांत मोठे लसीकरण केंद्र असलेल्या वांद्रे कुर्ला संकुल (बीकेसी) येथील लसीचे डोस संपले आहेत. बीकेसीतील जम्बो कोविड सेंटरमध्ये लसीकरण केंद्राच्या बाहेर आज लस संपल्याने नागरिकांना लस न घेताच पुन्हा माघारी फिरावे लागले आहे. त्यामुळे लसीकरणासाठी आलेल्या अनेक वयस्कर नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला.

काही नागरिक लसीकरणासाठी उन्हात रांगेत उभे होते. ’कोविशील्डचे 350 ते 400 डोस केंद्रात उपलब्ध होते. मंगळवार सकाळपासून ज्यांनी केंद्रावर नोंदणी केली, त्या नागरिकांना देण्यात आले आहेत; मात्र त्यानंतर लसीचा पुरवठा झालेला नाही. त्यामुळे पहिला डोस घेणार्‍यांना वाट पाहावी लागणार आहे. दुसरा डोस देण्यासाठी कोव्हॅक्सिनचे दोन हजार डोस उपलब्ध असून ते आज दिवसभरात दिले जातील,’ असे लसीकरण केंद्राचे प्रमुख राजेश डेरे यांनी सांगितले. ’संध्याकाळपर्यंत आम्हाला कोव्हिशील्डचे डोस पुरवले जातील, असे सांगण्यात आले आहे. जर डोस मिळाले तर पुन्हा लसीकरण सुरू केले जाईल. कोव्हिशील्डच्या लसी संपल्यासंदर्भात काल रात्री उशीरा माहिती मिळाली,’ असे त्यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रात सध्या कोरोना रुग्णसंख्येचा उच्चांक गाठला जात आहे. त्यामुळे राज्य सरकारने आपला लसीकरणाचा वेगदेखील वाढविला आहे. सध्या राज्याकडे लस तुटवडा असल्याचे चित्र वेळोवेळी समोर येत आहे.

COMMENTS