समताज स्पोर्टस चॅम्प’  विशेषांकाचे प्रकाशन

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

समताज स्पोर्टस चॅम्प’ विशेषांकाचे प्रकाशन

कोपरगाव प्रतिनिधी : राष्ट्रीय हॉकी पटू मेजर ध्यानचंद यांचा जन्म दिवस २९ ऑगस्ट हा राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणुन क्रीडा क्षेत्रात उत्साहात साजरा केला जात

पथदिवे बसवण्यासाठी सामग्री उपलब्ध करून देण्यासाठी माजी नगरसेवक प्रसाद आव्हाड यांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन
दिवाळी निमित्त वृद्धाश्रमात आरोग्य तपासणीद्वारे मोफत औषधांचे वाटप
शब्दगंध परिषदेचे ऑक्टोबरमध्ये साहित्य संमेलन

कोपरगाव प्रतिनिधी : राष्ट्रीय हॉकी पटू मेजर ध्यानचंद यांचा जन्म दिवस २९ ऑगस्ट हा राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणुन क्रीडा क्षेत्रात उत्साहात साजरा केला जातो. या दिवसाला क्रीडा क्षेत्रात विशेष महत्व देण्यात आलेले आहे. राष्ट्रीय क्रीडा दिन समता इंटरनॅशनल स्कूल मध्ये ही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करत २०२०-२०२१ या वर्षी समताच्या विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात मिळविलेल्या प्राविण्याबद्दल यशस्वी विद्यार्थ्यांचा समता इंटरनॅशनल स्कूलचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
प्रसंगी ‘समताज स्पोर्टस चॅम्प’ विशेषांकाचे प्रकाशन कार्यक्रमाचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे, मॅनेजिंग ट्रस्टी सौ.स्वाती कोयटे, मुख्य कार्यवाहक श्री. संदीप कोयटे, शैक्षणिक संचालिका सौ.लिसा बर्धन यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. या विशेषांकाच्या माध्यमातून सर्वच विद्यार्थ्यांना या क्रीडा प्रकाराविषयी माहिती व्हावी, तसेच खेळाविषयी आवड निर्माण व्हावी तसेच समताच्या यशस्वी विद्यार्थ्यांची ओळख झाली आहे.
प्रकाशना नंतर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना संस्थेचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे म्हणाले कि,’खेळामुळे आरोग्य सुदृढ बनते त्यामुळे समता विद्यार्थ्यांच्या दृष्टीकोनातून विविध क्रीडा प्रकारच्या माध्यमातून त्यांचे आरोग्य सुदृढ बनविण्याचे प्रयत्न समता सदैव करत आहे. त्यामुळे समताच्या विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा प्रकारात यश संपादन करून समताचे नाव महाराष्ट्रात नावारूपाला आणून महाराष्ट्राच्या बाहेर ही प्राविण्य मिळवून समताचा झेंडा फडकविला आहे.’
तसेच ते पुढे म्हणाले कि, ‘समताच्या विद्यार्थ्यांनी समता पॅटर्न नुसार इ.१० वी आणि इ.१२ वी च्या परीक्षेमध्ये जिल्ह्यात आणि तालुक्यात यश संपादन केले असून क्रीडा क्षेत्रातही समता स्कूलचे विद्यार्थी यश संपादन करीत आहे, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. समता त्यांच्या सदैव पाठीशी आहे. या सर्व यशामध्ये समता स्कूलचे व्यवस्थापन मंडळ, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे समता स्कूलचा प्रत्येक सेवक हा आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला पाहिजे. या अनुषंगाने देखील समता विशेष प्रयत्न करत आहोत.
या विशेषांकाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना या क्रीडा प्रकाराविषयी माहिती व्हावी, विविध खेळांमुळे आरोग्य सुदृढ बनते त्यामुळे समताच्या विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्राला देखील विशेष महत्व दिले पाहिजे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपप्राचार्य श्री.समीर अत्तार यांनी केले कार्यक्रमाला काही विद्यार्थी व पालक यांनी फेसबुक द्वारा ऑनलाइन उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. कार्यक्रम यशस्वितेसाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आदींची विशेष परिश्रम घेतले. समता स्कूलच्या एल.के.जी. आणि यु.के.जी.तील विद्यार्थी समता स्कूलमध्ये प्रत्यक्षात उपस्थित राहिले तर हजारो विद्यार्थी आणि त्यांचे पालकांचा ऑनलाइन उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. आभार क्रीडा शिक्षक रोहित महाले यांनी मानले.

COMMENTS