संसदेत महिला सदस्यांसोबत झालेली धक्काबुक्की अशोभनीय – नवाब मलिक

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संसदेत महिला सदस्यांसोबत झालेली धक्काबुक्की अशोभनीय – नवाब मलिक

मुंबई : संसदेत महिला सदस्यांसोबत पुरुष मार्शलने जी धक्काबुक्की केली. बळाचा वापर करण्यात आला ही घटना अशोभनीय आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख

युक्रेनची नाटो राष्ट्रांकडूनच फसवणूक !
बारामतीत रंगला ’तुतारी’ चिन्हाचा वाद
पीएमपीची दोन नव्या मार्गावर सेवा सुरू

मुंबई : संसदेत महिला सदस्यांसोबत पुरुष मार्शलने जी धक्काबुक्की केली. बळाचा वापर करण्यात आला ही घटना अशोभनीय आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी नाराजी व्यक्त केली आहे. संसदेचे कामकाज दोन दिवसाअगोदर स्थगित करण्यात आले. याचा अर्थ केंद्रसरकार जनतेच्या प्रश्नापासून पळ काढत होते. पेगॅसस प्रकरण, शेतीचा कायदा असेल, जातनिहाय जनगणना असेल या सर्व प्रश्नांवर चर्चा न करता किंवा त्याचे उत्तर न देता संसदेचे कामकाज स्थगित करण्यात आले. याचा अर्थ संसदेत कोणतेच उत्तर द्यायचे नाही असे धोरण सरकारचे होते असेही नवाब मलिक म्हणाले.
महिला सदस्यांचा अपमान करण्यात आला. लोकशाहीत अशाप्रकारची घटना योग्य नाही. यावर लोकसभा अध्यक्ष व राष्ट्रपतींनी चिंता व्यक्त केली परंतु त्यांनी सरळ- सरळ केंद्रसरकारला याप्रकरणी विचारणा करण्याची गरज होती. मात्र त्यांनी राजकीय दबावामुळे तसे केले नसावे असेही नवाब मलिक म्हणाले.

COMMENTS