सत्ताधारी आमदारांची राज्यपालाकडे पाठ ! भाजपाचे आमदार उपस्थित हिंगोली / नारायण घ्यारसंविधानाने जो मला अधिकार दिलेला आहे तो मी बजावण्यासाठी प्रत्यक्
सत्ताधारी आमदारांची राज्यपालाकडे पाठ ! भाजपाचे आमदार उपस्थित
हिंगोली / नारायण घ्यार
संविधानाने जो मला अधिकार दिलेला आहे तो मी बजावण्यासाठी प्रत्यक्षात हिंगोली येथे आलो आहे. जिल्ह्यात जो काही सिंचन प्रश्न आहे, त्याची नेमकी काय परिस्थिती आहे. तो पूर्णत्वास गेला की अपूर्ण राहिला आहे, हे पाहण्यासाठी मी हिंगोली येथे आलो असल्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी बोलताना व्यक्त केले
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे कालपासून (गुरूवार) मराठवाडा दौऱ्यावर आहेत. ते नांदेड येथून हिंगोली जिल्ह्यात दाखल झाले. ते शासकीय विश्रामगृह येथे दाखल होताच त्यांचे पोलीस प्रशासनाच्यावतीने सलामी देण्यात आली. कोश्यारी यांनी यावेळी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन जिल्ह्याचा आढावा घेतला. त्यानंतर राज्यपाल महोदयांनी संत नामदेव महाराज तीर्थक्षेत्रांना भेट देऊन आशीर्वाद घेतले ,राज्यपाल यांनी प्रसार माध्यमच्या प्रतिनिधी सोबत संवाद साधून, संविधानाने दिलेला अधिकार बजावण्यासाठी आपण दौऱ्यावर आलो असल्याचे त्यांनी पत्रकारांशी सांगितले. येथील सिंचन प्रश्न कसा आहे, किती वाढ झाली, अपूर्ण राहण्याची कारणे काय आहेत, याचा संपूर्ण आढावा घेऊन हा प्रश्न शासनाकडे मांडणार असल्याचे सांगितले. तसेच जिल्ह्यातील इतर प्रश्नांचा देखील आढावा घेतला. हे सर्वच प्रश्न राज्य व केंद्र शासनाकडे मांडणार असल्याचे राज्यपाल यांनी सांगितले. तर जिल्ह्यात महिला रुग्णालय उभारण्या संदर्भात विचारणा करताच हा माझा अधिकार नसल्याचे शासकीय विश्रागृहातील सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. मात्र राज्यपाल दौऱ्यावर असताना सत्ताधारी दोन आमदारांनी या दौऱ्याकडे पाठ फिरवली आहे तर खासदारही फिरकले नसल्याचे चित्र दिसून आले यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी शंकर बरगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राधा बिनोद शर्मा, पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती.जिल्ह्यातील सिंचन क्षेत्रातील अनुशेष अधिक असल्याने जिल्ह्यात सिंचनाच्या बाबतीत उपाययोजना करणे आवश्यक आहे. जिल्ह्यात सिंचनाच्या प्रलंबित असलेल्या योजना तात्काळ राबविल्यास शेतकऱ्यांना त्याचा शेतीसाठी फायदा होईल. बँकांनी शेतकऱ्यांना शेतीसाठी पीक कर्ज वेळेवर उपलब्ध करुन द्यावे. तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे होणाऱ्या नुकसान भरपाईपोटी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांना लाभ मिळवून द्यावा. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना लाभ देण्यात यावा. जिल्ह्यातील अनुसुचित जमातीच्या नागरिकांना त्यांच्या विकासासाठी असलेल्या योजनांबाबत जनजागृती करुन योजना प्रभावीपणे राबवाव्यात. तसेच त्यांच्या मुलां-मुलींच्या शिक्षणांत प्रगती होईल यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. महिला सुरक्षा, पोषण आहार व आर्थिक सक्षमीकरणाच्या योजना अतिशय चांगल्या असून या योजनांची अंमलबजावणी करावी. जिल्ह्यातील महिलांना बचतगटाच्या चळवळीत सहभागी करुन घेवून त्यांचा विकास साधत त्यांना उद्योग-व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहित करावे. मानव विकास निर्देशांकात प्रगती साधण्यासाठी संबंधित विभागानी एकत्रित प्रयत्न करावे. जिल्ह्यात सुंदर माझे कार्यालय, शाळा, गाव असे उपक्रम राबवावेत. तसेच कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेवून प्रशासनाने वेळेत आरोग्याच्या सर्व उपाययोजना तयार ठेवाव्यात, असे निर्देशही महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी यावेळी दिले.यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी शंकर बरगे यांनी कृषी, सिंचन, वन हक्क, तिर्थक्षेत्र, आदिवासी विकास, मानव विकास, जलयुक्त शिवार आदी योजनासह जिल्ह्यातील विविध विकास योजनांची माहिती सादरीकरणांद्वारे सादर केली.या बैठकीस विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते .
ऐन वेळेवर देण्यात आली माजी आमदाराला पास
-राज्यपाल यांना भेटण्यास कुणालाही परवानगी दिलेली नव्हती, शासकीय विश्रामगृहाच्या मुख्य प्रवेशद्वारावरच निवेदन पोलीस प्रशासनाच्यावतीने स्वीकारून त्याची नोंद घेण्यात येत होती. तर माजी आमदार गजानन घुगे हे राज्यपालांच्या भेटीसाठी आले असता त्यांना पोलिसांनी अडवले होते. मात्र, त्यांचे पास तात्काळ जाग्यावरच बनवण्यात आले होते. तेव्हा कुठे त्यांना आत प्रवेश देण्यात आला होता.
हिंगोली जिल्ह्याचे सिंचन क्षेत्र कमी –
हिंगोली जिल्ह्यात सिंचन क्षेत्र हे 35 टक्के पेक्षा कमी आहे. अन् अनुशेष हा मोठा आहे. त्यामुळे हे क्षेत्र कसे वाढेल यासाठी मी केंद्र व राज्य शासनाकडे याचा पाठपुरावा करणार आहे. जेणेकरून येथे सिंचन क्षेत्र जर वाढले तर निश्चितच हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी हे क्षेत्र अतिशय महत्त्वाचे ठरेल असे राज्यपाल भगतसिंग यांनी बोलताना व्यक्त केले
COMMENTS