संजीवनी डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर म्हणजे आरोग्य सुविधायुक्त सेंटर – देवेंद्र फडणवीस

Homeमहाराष्ट्रअहमदनगर

संजीवनी डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर म्हणजे आरोग्य सुविधायुक्त सेंटर – देवेंद्र फडणवीस

उपचारादरम्यान रूग्णांची अचानक खालावणारी तब्बेत, या दरम्यान आरोग्य सुविधां उपलब्ध करण्यासाठी नातेवाईकांना सहन करावा लागणारा मनस्ताप यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात हेळसांड होत असल्याने

’आपली खरेदी आपल्या गावात’ उपक्रमातून आर्थिक उलाढाल वाढणार ः पुष्पाताई काळे
शेतकऱ्यावर गोळीबार करणारा आरोपी ; जेरबंद कर्जत पोलिसांची कामगिरी
कॉपी रोखण्यासाठी शिक्षकच बनले पोलीस

कोपरगांव  शहर प्रतिनिधी – उपचारादरम्यान रूग्णांची अचानक खालावणारी तब्बेत, या दरम्यान आरोग्य सुविधां उपलब्ध करण्यासाठी नातेवाईकांना सहन करावा लागणारा मनस्ताप यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात हेळसांड होत असल्याने संजीवनी उदयोग समूह मार्फत सुरु करण्यात आलेले संजीवनी डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर हे आरोग्य सुविधायुक्त सेंटर असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे विरोधीपक्ष नेते माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी केले. कोपरगांव मतदारसंघात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असुन कोरोनाला हद्दपार करण्यासाठी विविध उपाय योजना राबविल्या जात आहे. रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नसल्यामुळे रुग्णांबरोबर नातेवाईकांची देखील मोठी धावपळ होत आहे. ही सर्व परिस्थिती लक्षात घेता संजीवनी युवा प्रतिष्ठाण यांनी आत्मा मालिक शैक्षणिक संकुलात संजीवनी डेडिकेटड कोविड हेल्थ सेंटर राज्याचे विरोधी पक्ष नेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट देवुन आॅक्सीजनयुक्त बेडची पाहणी केली याप्रसंगी बोलत होते.
देवेंद्र फडणवीस पुढे बोलतांना म्हणाले की, कोपरगांव मतदार संघात कोरोनाची परिस्थिती गंभीर झालेली असुन सदर रुग्णांना मदतीसाठी संजीवनी उद्योग समुहाने मोठी जवाबदारी उचल्यामुळे रुग्णांसाठी फलदायी ठरणार आहेत त्याच बरोबर या ठिकाणी आरोग्य विभाग हा त्यांची जवाबदारी उत्तम पध्दतीने पार पाडीत आहे त्याचबरोबर स्वच्छता विभागाचे कर्मचारी देखील आपला जीव धोक्यात टाकुन काम करतात तसेच संजीवनी कोविड केअर टिम, आरोग्य व जेवन व्यवस्था ही रुग्णांना देत आहे. वाफेचे मशीन याची रुग्णांच्या उपचारासाठी संजीवनी कोविड केअर सेंटरने व्यवस्था केल्यामुळे रुग्णांना दिलासा मिळत आहे. राज्यभर भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता सक्रिय आहे याचाच एक भाग म्हणुन आज सौ. कोल्हे सुरु केलेले कोविड सेंटर असल्याचे शेवटी फडणवीस म्हणाले.  
कोपरगाव औद्योगिक वसाहतचे चेअरमन व अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक, युवानेते विवेक भैया कोल्हे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी आत्मा मालिक ध्यान पीठाचे सर्व संत परिवार, संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, भाजपा प्रदेषसचिव तथा माजी आमदार सौ. स्नेहलता कोल्हे, संजीवनी कारखान्याचे व्हा. चेअरमन आप्पासाहेब दवंगे, आत्मा शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी, जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, तहसीलदार योगेश चंद्रे, ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक कृष्णा फुलसौंदर, तालुका वैद्यकीय अधिकारी संतोष विधाते, गटविकास अधिकारी सचिन सुर्यवंशी पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, नगर शहर जिल्हाध्यक्ष भैय्याजी गंधे, रविंद्र बोरावके, शरद नाना थोरात, अशोकराव पवार, शिर्डी नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, गटनेते रवींद्र पाठक, पराग संधान, उपनगराध्यक्ष स्वप्निल निखाडे, ओ.बी.सी चे प्रकाश चित्ते, कैलास खैरे, किरण बो-हाडे, सचिन तांबे, साहेबराव रोहोम, शहराध्यक्ष दत्ता काले, विनोद राक्षे, विक्रम पाचोरे, अविनाष पाठक, कैलास राहणे आदि उपस्थित होते.

COMMENTS