संगीत ऐकल्याने 13 जणांची गोळ्या झाडून हत्या

Homeताज्या बातम्यादेश

संगीत ऐकल्याने 13 जणांची गोळ्या झाडून हत्या

काबूल -अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांनी सत्ता स्थापन केल्यानंतर अनेक कठोर निर्बंध लादण्यास सुरूवात केली असून, या निर्बंधाविरोधात जर कुणी कृती केली, तर

अंध, अपंग, निराधारांना समता परिवाराची अन्नसेवा
धक्कादायक! आधी प्रेमविवाह मग घरी शौचालय नसल्यामुळे नवविवाहितेची आत्महत्या
*मेहुणीवर अत्याचार करून नंतर पाच जणांची हत्या l DAINIK LOKMNTHAN*

काबूल -अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांनी सत्ता स्थापन केल्यानंतर अनेक कठोर निर्बंध लादण्यास सुरूवात केली असून, या निर्बंधाविरोधात जर कुणी कृती केली, तर त्याला मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात येत असल्याचे कू्रर प्रकार समोर आले आहेत. पूर्व अफगाणिस्तानमध्ये एका लग्न समारंभात संगीत वाजवत असताना 13 जणांची हत्या करण्यात आली.
नांगरहार प्रांतातील शम्सपूर मार घुंडी गावात शुक्रवारी रात्री तालिबानी लढवय्ये असल्याचा दावा करणार्‍या बंदूकधार्‍यांनी एका लग्न समारंभावर हल्ला केला. अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यापासून तालिबानने कडक इस्लामिक कायदे लागू करण्यास सुरुवात केली आहे. त्याचा परिणाम शहरी भागात कमी दिसत असला तरी ग्रामीण भागात कायद्यांची काटेकोरपणे अंमलबजावणी होत आहे. तालिबान सरकारचे प्रवक्ते जबिउल्ला मुजाहिद यांनी सांगितले की, तालिबानने या घटनेच्या संबंधात दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. एक आरोपी अद्याप फरार असून, त्याचा शोध सुरू आहे. पकडलेल्या घटनेतील गुन्हेगारांना शरिया कायद्यानुसार शिक्षेला सामोरे जावे लागले आहे. या आरोपींनी आपले वैयक्तिक भांडण करण्यासाठी इस्लामिक अमिरातच्या नावाचा वापर केला आहे. पीडितेच्या नातेवाईकाने सांगितले की, तालिबानी सैनिकांनी लोकांवर गोळीबार केला.
मुजाहिद म्हणाले, इस्लामिक अमिरातीच्या श्रेणीतील कोणालाही संगीत किंवा कोणत्याही गोष्टीपासून दूर करण्याचा अधिकार नाही. लोक फक्त संगीत ऐकणार्‍यांचे मन वळवण्याचा प्रयत्न करू शकतात. हाच मुख्य मार्ग आहे.’ ते म्हणाले, ‘जर कोणी स्वतःहून कोणाला मारले असेल, ते आमचे लढवय्ये असले तरी हा गुन्हा असून आम्ही त्यांना न्यायालयात हजर करू आणि त्यांना कायद्याला सामोरे जावे लागेल. देशावर कब्जा केल्यापासून तालिबानी लढवय्ये देशातील प्रमुख शहरांमध्ये शस्त्रास्त्रांसह दिसत आहेत. हे लोक कधी-कधी इस्लामिक कायदे लागू करण्यासाठी रक्तपातही घडवतांना दिसून येत आहे.

COMMENTS