श्रीरामपुरात वाळू तस्करांकडून दोन कोटींचा मुद्देमाल जप्त

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

श्रीरामपुरात वाळू तस्करांकडून दोन कोटींचा मुद्देमाल जप्त

श्रीरामपूर तालुक्यातील मातुलठाण येथे गोदावरी नदीपात्रातून रात्रीच्या वेळी बेकायदा वाळू उपसा करणार्‍या तस्करांवर जिल्हा पोलिस प्रमुख मनोज पाटील यांच्या आदेशाने कारवाई करण्यात आली.

राहुरीत महाशिवरात्रीनिमित्त कार्यक्रमांचे आयोजन
कोल्हार येथील प्रवरा नदीत बुडून एकाचा मृत्यू  
लोकनेते बाळासाहेब थोरात गौरव पुरस्काराने 25 गुणवंत शिक्षकांचा सन्मान

श्रीरामपूर/प्रतिनिधी :श्रीरामपूर तालुक्यातील मातुलठाण येथे गोदावरी नदीपात्रातून रात्रीच्या वेळी बेकायदा वाळू उपसा करणार्‍या तस्करांवर जिल्हा पोलिस प्रमुख मनोज पाटील यांच्या आदेशाने कारवाई करण्यात आली. कारवाईत जेसीबी व पोकलेन मशीनसह सुमारे दोन कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी पाच आरोपींनाही तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले.

आरोपींमध्ये सुनीलकुमार चुरामन महतो (बेरमो, जि.बोकारो, झारखंड), मनजीत धुप्पड (आनंदवली, नाशिक), अंजनी गौरीशंकर विश्‍वकर्मा (राजोहा, ता.बहरी, मध्य प्रदेश), युवराजसिंग केशरसिंग भंडारी (बागेसर, डेहराडून) व रवी धुप्पड (श्रीरामपूर) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. रविवारी अडीच वाजता ही कारवाई करण्यात आली. आरोपींकडून दोन पोकलेन, एक बुलडोझर, एक ट्रक, दोन जेसीबी व चार ब्रास वाळू, मोबाईल असा एक कोटी 83 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींवर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ.दीपाली काळे, पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या आदेशानुसार निरीक्षक मधुकर साळवे यांनी कारवाई केली. पथकामध्ये पोलिस उपनिरीक्षक अतुल बोरसे, हवालदार राजेंद्र आरोळे, सुरेश औटी, दादासाहेब लोंढे, आबासाहेब गोरे, काका मोरे, नितीन चव्हाण, रवींद्र माळी, नितीन शिरसाठ, सुनील शिंदे यांचा पथकात समावेश होता.

COMMENTS