Homeताज्या बातम्या

श्रीगोंद्यात भर रस्त्यात गॅस सिलेंडर वितरण; नागरिकांची कोंडी, सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

श्रीगोंदा : स्फोटक पदार्थांच्या साठवणुकीसाठी आणि वितरणासाठी असलेली नियमावली लक्षात घेता गोडावून हे शहरापासून काही अंतरावर असणे बंधनकारक असतानाही श्रीगोंदा शहरात भर रस्त्यावर गॅस सिलेंडरचे वितरण होत असल्याचे चित्र समोर आले आहे. यामुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत असून सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. शहरातील भानेश्वर गॅस एजन्सीकडून मुख्य रस्त्यावरच गॅस सिलेंडरचे वितरण करण्यात येत असल्याचे दिसून आले. सिलेंडर घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नागरिक रस्त्यावर जमा होत असल्याने वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे. तसेच रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणावर गॅस सिलेंडर ठेवण्यात येत असल्याने अपघात किंवा आग लागण्याचा धोका निर्माण होत असल्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. शुक्रवारी सकाळच्या सुमारास गॅस वितरणासाठी वाहन शहरातील मुख्य मार्गावर उभे करून सिलेंडर वाटप करण्यात आले. यावेळी सिलेंडर घेण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. दुचाकी, चारचाकी वाहनांसह पादचाऱ्यांनाही मार्ग काढताना मोठी कसरत करावी लागत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. नियमांनुसार स्फोटक पदार्थांचे गोडावून शहरापासून सुरक्षित अंतरावर असणे आवश्यक असते. तसेच वितरण करताना सुरक्षेचे सर्व नियम पाळणे अपेक्षित असते. मात्र प्रत्यक्षात भर रस्त्यातच सिलेंडरचे वितरण होत असल्याने प्रशासनाच्या देखरेखीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. या प्रकारामुळे नागरिकांच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे प्रशासनाने या प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन योग्य ठिकाणी गॅस वितरणाची व्यवस्था करावी आणि शहरातील वाहतूक व नागरिकांची सुरक्षितता लक्षात घेऊन आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

देशात खतांच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता; इराण-इस्त्रायल युद्धामुळे खत आयातीवर होणार परिणाम
गटनेते खुर्शीद आलम यांनी दोन दिवसीय सभा गाजवली,बीड शहरातील अनेक महत्वाचे प्रश्न मार्गी लागणार,
नियम व अटी पूर्ण केल्यासच गुंठेवारी प्रस्तावांना मंजुरी : मंत्री उदय सामंत

श्रीगोंदा : स्फोटक पदार्थांच्या साठवणुकीसाठी आणि वितरणासाठी असलेली नियमावली लक्षात घेता गोडावून हे शहरापासून काही अंतरावर असणे बंधनकारक असतानाही श्रीगोंदा शहरात भर रस्त्यावर गॅस सिलेंडरचे वितरण होत असल्याचे चित्र समोर आले आहे. यामुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत असून सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.

शहरातील भानेश्वर गॅस एजन्सीकडून मुख्य रस्त्यावरच गॅस सिलेंडरचे वितरण करण्यात येत असल्याचे दिसून आले. सिलेंडर घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नागरिक रस्त्यावर जमा होत असल्याने वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे. तसेच रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणावर गॅस सिलेंडर ठेवण्यात येत असल्याने अपघात किंवा आग लागण्याचा धोका निर्माण होत असल्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.

शुक्रवारी सकाळच्या सुमारास गॅस वितरणासाठी वाहन शहरातील मुख्य मार्गावर उभे करून सिलेंडर वाटप करण्यात आले. यावेळी सिलेंडर घेण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. दुचाकी, चारचाकी वाहनांसह पादचाऱ्यांनाही मार्ग काढताना मोठी कसरत करावी लागत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.

नियमांनुसार स्फोटक पदार्थांचे गोडावून शहरापासून सुरक्षित अंतरावर असणे आवश्यक असते. तसेच वितरण करताना सुरक्षेचे सर्व नियम पाळणे अपेक्षित असते. मात्र प्रत्यक्षात भर रस्त्यातच सिलेंडरचे वितरण होत असल्याने प्रशासनाच्या देखरेखीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

या प्रकारामुळे नागरिकांच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे प्रशासनाने या प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन योग्य ठिकाणी गॅस वितरणाची व्यवस्था करावी आणि शहरातील वाहतूक व नागरिकांची सुरक्षितता लक्षात घेऊन आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

COMMENTS