शेतीला आधुनिक बनवण्यासाठी आणि त्यातून शेतकर्यांना अधिक उत्पन्न मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारने मायक्रोसॉफ्टची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे.
नवीदिल्लीः शेतीला आधुनिक बनवण्यासाठी आणि त्यातून शेतकर्यांना अधिक उत्पन्न मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारने मायक्रोसॉफ्टची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी कृषी मंत्रालयाने मायक्रोसॉफ्ट इंडियाबरोबर करार केला आहे. देशातील सहा राज्यांमधील (उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, हरयाणा, राजस्थान आणि आंध्र प्रदेश) दहा जिल्ह्यांतील संभर गावांत पायलट प्रोजेक्ट सुरू होणार आहे.
केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या उपस्थितीत कृषी मंत्रालय आणि मायक्रोसॉफ्ट इंडिया यांनी हा करार केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची डिजिटल शेतीची कल्पनाशक्ती आता प्रत्यक्षात साकार होत असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. 2014 मध्ये पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारल्यापासून मोदी यांनी शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर भर दिला आहे. तंत्रज्ञानाचा वापर केल्यास शेतकर्यांना मोठा फायदा होणार आहे. तसेच नवी पिढीदेखील शेतीकडे आकर्षित होईल, असे तोमर म्हणाले. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतीमालाचा उत्पादन खर्च कमी करणे आणि शेतकर्यांच्या पिकांना चांगला भाव देणे हा या कराराचा हेतू आहे. करारानुसार मायक्रोसॉफ्ट इंडिया स्मार्ट व पद्धतशीर शेतीसाठी विशेष इंटरफेस विकसित करेल. ज्यात कापणीनंतरचे व्यवस्थापन आणि वितरण यांचा समावेश आहे.
COMMENTS