अहमदनगर (प्रतिनिधी)- भातकुडगाव फाटा येथील अवैध खाजगी कापूस खरेदीदारांवर कारवाई व्हावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय येथील भूजल सर्वेक्षण कार
अहमदनगर (प्रतिनिधी)-
भातकुडगाव फाटा येथील अवैध खाजगी कापूस खरेदीदारांवर कारवाई व्हावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय येथील भूजल सर्वेक्षण कार्यालयाच्या आवारात विलास फाटके यांचे उपोषण चालू करण्यात आले आहे.
शेवगाव-नेवासा राज्यमार्गावरील भातकुडगाव फाटा येथील अवैध खाजगी कापूस खरेदीदारांवर कारवाई व्हावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर सामाजिक कार्यकर्ते विलास फाटके यांनी उपोषण सुरू केले आहे.फाटके यांनी अहमदनगर जिल्हा उपनिबंधक यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शेवगाव तालुक्यातील भातकुडगाव फाटा येथे खाजगी दलालाकडून कापूस खरेदी केला जातो.या दलालांकडे कापूस खरेदीचा कुठल्याही प्रकारचा परवाना नाही. या व्यापा-यांनी खरेदी केलेल्या मालाबाबत मार्केट कमिटी (बाजार समिती) कुठलीही हमी घेत नसल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात फसवणूक व लुटमार होत आहे.
या दलालांकडे घेतलेल्या कापसांच्या वजनात मोठी तफावत आढळून येत आहे. यांचे वजन काटे कधीही कोणीही तपासणी करत नाही. शेतकऱ्यांकडून उधार कापूस घेतला जातो. नंतर शेतक-यांना पैसे दिले जात नाही. शेतकऱ्यांवर दादागिरी केली जाते. कष्टाने पेकवलेल्या कापसाची लुटमार या वेक्तींकडून केली जात आहे. याबाबत मी बाजार समिती व सहायक निबंधक सहकार संस्था कार्यालय शेवगाव याच्याकडे तोंडी तक्रारी केलेल्या आहेत. परंतु कुठल्याही प्रकारची कारवाही केली जात नाही. दलाल म्हणतात आम्ही वरपर्यंत हप्ते देतो. त्यामुळे आमच्यावर कोणीही कारवाई करू शकत नाही. त्यामुळे या दलाला मार्फत शासनाच्या डोळ्यात दिवसाढवळ्या धूळ फेकली केली जात आहे. शेतक-यांची लूट केली जात आहे.
सहकार खाते हे उघड्या डोळ्याने पाहत आहेत. तरी आपण स्व:त प्रत्यक्ष ठिकाणी येऊन कारवाई करावी. शेतकऱ्यांची होणारी लुट थांबवावी.आपण जर शेतक-यांना न्याय मिळून दिला नाही तर, लोकशाही मार्गाने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणे भाग पडेल. आमच्या निवेदनाचे दखल घेऊन लुटमार करणाऱ्या दलालांवर फसवणुकीचा फैजदारी गुन्हा दाखल कराव्यात, असे निवेदनात म्हटले आहे .
COMMENTS