शेतकरी संकटाच्या खाईत असताना लाखो रुपयाची उधळ पट्टी कशासाठी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शेतकरी संकटाच्या खाईत असताना लाखो रुपयाची उधळ पट्टी कशासाठी

बीड (प्रतिनिधी) एकीकडे शेतकरी जीवन मारणासाठी झगडत आहे महाराष्ट्रात बीड जिल्हा आत्महत्येत नंबर 1 वर आहे , जिल्ह्यातल शेतकऱ्यांना त्याच्या हक्काचा प

Beed : तहसीलदार सचिन खाडे यांच्या हस्ते गणेश विसर्जन (Video)
मी ज्या भागात घडलो तेथे माझा सन्मान होत आहे ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे -: डॉ.गणेश चंदनशिवे
Beed : माजलगाव नगराध्यक्ष यांची बदनामी करणाऱ्या वर कारवाई करा ! (Video)

बीड (प्रतिनिधी)

एकीकडे शेतकरी जीवन मारणासाठी झगडत आहे महाराष्ट्रात बीड जिल्हा आत्महत्येत नंबर 1 वर आहे , जिल्ह्यातल शेतकऱ्यांना त्याच्या हक्काचा पिक विमा त्याच्या हक्काचे पिक कर्ज त्याच्या हक्काचे अतिवृष्टीचे अनुदान आज मिळाला तयार नाही, आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री  सामाजिक न्याय मंत्री मा धनंजय मुंडे यांनी शाही उत्सवाचे आयोजन करून गरिब शेतकर्यांची थट्टा केल्याचा आरोप शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई मोहन गुंड यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे,
बीड जिल्हा तीन महिन्यात जवळपास 50 शेतकऱ्यांनी आपले आत्महत्या करून जीवन संपवले आहे दोन वर्षाच्या कोरोणाच्या काळात शेतीमालाला भाव मिळाला नाही थोडे बहुत पिकवले ते विकले नाही कोरोनातून सावरतो का नाहीतर अतिवृष्टीचा मारा झाला हाताला आलेले पीक जमीन उधवस्त झाले, महागाईचा भडका जीवन जगणं सामान्याचे मुश्कील झालं,अनेक साखर कारखान्या कडून एफ आरपी प्रमाणे शेतकऱ्यांचे उसाचे बिल मिळाले नाहीत विज बिल कसे भरावे महागाईत जीवन जगणं अवघड झाला आसताना, दिवाळी सारखा सण कसा करायचा हा प्रश्न समोर असताना दुसरीकडे परळी शहरात पालकमंत्र्यांनी सपना चौधरी सारखी डान्सर आणून लाखो रुपये खर्च करून दिवाळी साजरी केली गरीबाच्या दिवाळीच काय याचा थोडा तरी विचार करायला हवा होता, लाखो रुपयांची उधळपट्टी कशासाठी गळ्यातलं ताईत करून तुम्हाला लोक प्रतिनिधी म्हणून लोकांनी निवडून दिले याचा अपमान केला असल्याचा आरोप शेतकरी कामगार पक्षाचे भाई मोहन गुंड यांनी प्रसिद्धीपत्रकात केला आहे.

COMMENTS