शेअर बाजारात मोठी तेजी…. ८७४ अब्ज डॉलरची वाढ

Homeताज्या बातम्यादेश

शेअर बाजारात मोठी तेजी…. ८७४ अब्ज डॉलरची वाढ

प्रतिनिधी : मुंबईभारतीय शेअर बाजारने यावर्षी आतापर्यतची सर्वाधिक तेजी आणि वाढ नोंदवली आहे. मार्च २०२०ला गडगडलेल्या शेअर बाजाराने मोठीच झेप घेतली आहे.

आरोप- प्रत्यारोपाचे राजकारण
पेपरफुटीला चाप बसेल का ?
अपयशातून यशाचा मार्ग तयार करा ः आमदार आशुतोष काळे

प्रतिनिधी : मुंबई
भारतीय शेअर बाजारने यावर्षी आतापर्यतची सर्वाधिक तेजी आणि वाढ नोंदवली आहे. मार्च २०२०ला गडगडलेल्या शेअर बाजाराने मोठीच झेप घेतली आहे. सेन्सेक्स आणि निफ्टीची २३ आणि २५ टक्क्यांची वाढ झाली आहे.

परकीय आणि देशांतर्गत गुंतवणुकदारांनी एकत्रितरित्या जवळपास ८ अब्ज डॉलर मूल्याच्या शेअरची खरेदी केली आहे. यावर्षी भारतीय शेअर बाजारात ८७४ अब्ज डॉलरची वाढ झाली आहे.

३१ डिसेंबर २०२०ला भारतीय शेअर बाजार २.५२ अब्ज डॉलरवर होता. त्यात ३५ टक्क्यांची वाढ होऊन आता ३.४१ टप्पा पार करून पुढे गेला आहे.

गेल्या काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात तेजी आहे. आज सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन्ही निर्देशांक विक्रमी पातळीवर आहेत. सेन्सेक्सने ५९,००० चा टप्पा ओलांडला. सेन्सेक्स लवकरच ६०,००० च्या पार जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या विक्रमी तेजीमुळे भारतीय शेअर बाजार फ्रान्सच्या शेअर बाजाराला मागे टाकत जगातील सहावा सर्वात मोठा शेअर बाजार बनला आहे. बाजारातील भागभांडवल (मार्केट कॅपिटल) च्या दृष्टीने भारतीय शेअर बाजाराने ३.४० ट्रिलियन डॉलरचा टप्पा ओलांडला आहे.

बाजारमूल्यानुसार अमेरिकन शेअर बाजार जगात नंपहिल्या क्रमांकावर आहे. ‘वॉल स्ट्रीट’ या अमेरिकन शेअर बाजाराचे एकूण बाजारमूल्य ५१.३ ट्रिलियन डॉलर आहे. चीन दुसऱ्या क्रमांकावर आहे.

चीनच्या शेअर बाजाराचे एकूण भागभांडवल १२.४२ ट्रिलियन डॉलर आहे. जपानचा शेअर बाजार ७.४३ ट्रिलियन डॉलरच्या एकूण भागभांडवलानिशी तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर हॉंगकॉंगचा शेअर बाजार चौथ्या क्रमांकावर असून त्याचे बाजारमूल्य ६.५२ ट्रिलियन डॉलर आहे.

त्यानंतर इंग्लंडचा शेअर बाजार पाचव्या क्रमांकावर असून त्याचे एकूण बाजारमूल्य ३.६८ ट्रिलियन डॉलर आहे. भारतीय शेअर बाजार ३.४१ ट्रिलियन डॉलरच्या एकूण भागभांडवलानिशी सहाव्या क्रमांकावर आहे. ३.४० ट्रिलियन डॉलरच्या बाजारमूल्यानिशी फ्रान्स आता सातव्या क्रमांकावर गेला आहे.

COMMENTS