मुंबई : शिवसेना नेत्यांच्या मागे चौकशीचे शुक्लकाष्ट मागे लागले आहे. शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या शैक्षणिक संस्थावर अंमलबजावणी संचालनालय अर्थात ई
मुंबई : शिवसेना नेत्यांच्या मागे चौकशीचे शुक्लकाष्ट मागे लागले आहे. शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या शैक्षणिक संस्थावर अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने छापे टाकल्यानंतर परिवहनमंत्री अनिल परब यांना देखील ईडीने नोटीस पाठवली आहे. त्यानंतर परब यांची लोकायुक्ताकडून चौकशी होणार असून, तसे आदेश राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी दिल्यामुळे शिवेसेना नेत्यांमागील चौकशीचे शुक्लकाष्ट संपण्याची चिन्हे नाहीत.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याबाबतीत तपास सुरू केल्यानंतर बडतर्फ पोलीस अधिकारी यांच्या चौकशीत महत्त्वाची माहिती समोर आली होती. त्यानुसार या प्रकरणात अनिल परब यांचाही सगभाग असल्याचा संशय ईडीला आहे. मुंबई महापालिकेतील 50 कंत्राटदारांकडून प्रत्येकी दोन कोटी रुपये खंडणी गोळा करण्याची सूचना अनिल परब यांनी जानेवारीमध्ये दिली होती, असे वाझे याने न्यायालयालादेखील सांगितले आहे, याप्रकरणी ईडी परब यांची चौकशी करण्याची शक्यता आहे. तसेच परब यांना 2 सप्टेंबर रोजी लोकायुक्तांकडे चौकशीला हजर राहण्याचा आदेश लोकायुक्तांनी दिला आहे. यासंबंधीची माहिती भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी दिली आहे. लोकायुक्तांनी चौकशीसाठी दिलेल्या आदेशात ही चौकशी ऑनलाईन होणार आहे. राज्यातील परिवहन विभागातील उप प्रादेशिक अधिकारी परिवहन विभाग, वर्धा अधिकारी बजरंग खरमाटे यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी संगनमताने प्रादेशिक परिवहन विभागातील अधिकार्यांच्या बदल्या, पदस्थापना, प्रतिनियुक्ती, पदोन्नती प्रकरणी लाखो रुपये वसूल केल्याच्या आरोपाखाली ही चौकशी करण्यात येणार असल्याचे लोकायुक्तांच्या पत्रात म्हटले आहे. दिले आहेत. दरम्यान ईडीने मंगळवारी, सकाळी 11 वाजता परिवहन मंत्री परब यांना ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचा आदेश दिला आहे. तशी नोटीस ईडीने दिली आहे. मात्र मंत्री परब हे ईडीच्या कार्यालयात हजर राहणार नाहीत, अशी सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. त्याआधी परब यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्ष निवासस्थानी भेट घेतली. त्याआधी त्यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांचीही भेट घेतली, तसेच राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांचीही भेट घेतली. बजरंग खरमाटे हे नागपूर ग्रामीणच्या प्रादेशिक परिवहन विभागामधील उप परिवहन अधिकारी असून ते परिवहन मंत्री अनिल परब यांचे जवळचे मानले जातात. अनिल परब आणि बजरंग खरमाटे यांनी संगनमताने करोडो रुपये जमवले आणि आपसात वाटून घेतले, असा आरोप भाजप नेते किरिट सोमैय्या यांनी केला होता. त्यांनी दोन-दोन महिन्यांनी अनेक अधिकार्यांची बदली केली आणि 25-30 लाख रुपयांपासून एक कोटी रुपये घेऊन प्रमोशन केले असल्याचेही सोमैय्या यांनी आपल्या आरोपात म्हटले होते.
परब यांनी ईडीकडे मागितली 14 दिवसांची मुदत
परिवहनमंत्री अनिल परब यांना ईडीने मनी लॉन्डरिंगप्रकरणी चौकशीचा समन्स बजावला होता. त्यासाठी ईडी कार्यालयात त्यांना चौकशीसाठी उपस्थित राहण्याची सूचना केली होती. मात्र, अनिल परब मंगळवारी ईडीसाठी उपस्थित राहू शकले नाही. ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्यासाठी अनिल परब यांनी ईडीकडे 14 दिवसांचा वेळ मागितला आहे. मंत्रीपदाची जबाबदारी असल्याने काही ठरलेली कामे आहेत. त्यामुळं हजर राहू शकत नाही, असे अनिल परब यांनी ईडी कार्यालयात कळवले आहे.
COMMENTS