Homeमहाराष्ट्र

शिराळा तालुक्यात दोन ठिकाण आगीच्या घटना

ळा येथे गोठ्यास आग: बैलासह पाच जनावरांचा होरपळून

Aurangabad : “या” मातेवर आली वृद्धाश्रमात राहण्याची वेळ
विदर्भातील अनेक गावांना पावसाचा तडाखा
स्वच्छता सर्वेक्षणात नगर राज्यात दुसरे व देशात 32 वे

शिराळा येथे गोठ्यास आग: बैलासह पाच जनावरांचा होरपळून

मृत्यू; चरण येथे छपरास आग : दोन म्हैशीसह एक बैल जखमी  

शिराळा / प्रतिनिधी :  शिराळा येथील तात्यासो भांडवले यांच्या औढी रस्त्यावरील यादव मळ्यातील जनावरांच्या गोठ्यास आग लागून पाच जनावरांचा होरपळून मृत्यू झाला. यामध्ये एक खिलार जातीचा बैल, दोन गाभण म्हैशी, वासरू आणि एका रेडीचा समावेश आहे. एक म्हैस वाचली असून गंभीर स्वरुपात भाजली आहे. तसेच चरण, ता. शिराळा येथे जनावरांच्या छपरास आग लागून दोन म्हैशी व एक बैल जखमी झाले आहे. सुमारे 1 लाख 10 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. याची फिर्याद आकाराम तुकाराम आमले (वय 55) यांनी कोकरूड पोलिसात तक्रार दिली आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, शिराळा येथील तात्यासो भांडवले यांच्या औढी रस्त्यावरील यादव मळ्यातील जनावरांच्या गोठ्यास आग लागून पाच जनावरांचा होरपळून मृत्यू झाला. यामध्ये एक खिलार जातीचा बैल, दोन गाभण म्हैशी, वासरू आणि एका रेडीचा समावेश आहे. एक म्हैस वाचली असून गंभीर स्वरुपात भाजली आहे. रात्री उशीरापर्यंत आग आटोक्यात आणण्याचे काम सुरु होते. या आगीत जनावरांचे शेड, पिंजर, शेती औजारे असे अंदाजे नऊ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. माणुसकीच्या नात्याने समाजातील लोकांनी पुढाकार घेऊन भांडवले कुटुंबाला मदत गोळा करण्यास सुरुवात केली आहे.

चरण, ता. शिराळा येथील संशयित आरोपी नाना यशवंत नायकवडी (वय 50) यांनी फिर्यादी यांच्या छप्परा शेजारी आमले दरा परिसरातील शिर्के माळ येथे असलेल्या गवत पडीस सकाळी 11 च्या दरम्यान आग लावली होती. उन व वार्‍यामुळे ही आग शेजारी असलेल्या फिर्यादी आकाराम तुकाराम आमले यांच्या जनावरांच्या छप्परास लागली. या घटनेमध्ये छाप्परातील दोन म्हैशी व एक बैल 80 टक्के भाजल्याने जखमी झाले आहेत. त्यांच्यावर पशुवैद्यकीय अधिकार्‍यांनी प्राथमिक उपचार केले आहेत. तर छप्परा शेजारी असलेल्या फिर्यादी व नारायण तातोबा आमणे यांच्या गवताच्या गंजी जळून खाक झाल्या आहेत. यामध्ये सुमारे 1 लाख 10 हजार रुपयांचे नुकसान झाले असून अधिक तपास पोलीस नाईक तांबे वाघ करत आहेत.

COMMENTS