Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिगावचा पुनर्वसनाचा प्रश्‍न सोडवण्यात विरोधक अपयशी : निशिकांत भोसले-पाटील

इस्लामपूर / प्रतिनिधी : शिगावला दरवर्षी महापुराचा तडाखा बसतो. 60 टक्क्यांपेक्षा जास्त भाग पाण्याखाली जातो. शेतीचे, घराचे मोठे नुकसान होते. येथी

मेडिकल कॉलेजची टेंडर प्रक्रिया महिनाअखेर होणार
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी प्रतितास 1200 भाविकांना प्रवेश
स्वत:चे नाव लावयची लाज वाटणारा कसला प्रेरणास्त्रोत : आ. भाई जगताप

इस्लामपूर / प्रतिनिधी : शिगावला दरवर्षी महापुराचा तडाखा बसतो. 60 टक्क्यांपेक्षा जास्त भाग पाण्याखाली जातो. शेतीचे, घराचे मोठे नुकसान होते. येथील ग्रामस्थांनी 30 वर्षांपासून पुनवर्सनाची मागणी लावून धरली आहे. परंतु अकार्यक्षम आमदारांना तो प्रश्‍न सोडवता आला नाही, असा आरोप इस्लामपूर विधानसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार निशिकांत भोसले-पाटील यांनी केला.
इस्लामपूर विधानसभा मतदार संघातील शिगाव येथे प्रचार सभे दरम्यान ते बोलत होते. यावेळी प्रसाद पाटील, सागर खोत, सागर मलगुंडे, निवास पाटील, विष्णुपंत चव्हाण, हंबीरराव पाटील, चंद्रकांत देसाई, प्रताप पाटील, अरुण गावडे, सनी अहिर प्रमुख उपस्थित होते.
निशिकांत भोसले-पाटील म्हणाले, शिगाव गाव हे क्रांतिकारकांचे गाव म्हणून सर्वत्र परिचित आहे. आताही या गावाला क्रांती घडवायची आहे. ज्याला तुम्ही 35 वर्षे झाली निवडून देताय व सोसताय त्या माणसाने तुमच्यासाठी काय केलं, असा माझा तुम्हाला प्रश्‍न आहे. तुमची 30 वर्षांपासून पुनर्वसनाची मागणी आहे. ती त्यांना पूर्ण करता आली नाही. येथील समाज मंदिराचा प्रश्‍न जैसे थे आहे. प्रॉपर्टी कार्ड विषय सुटलेला नाही. मूलभूत प्रश्‍न त्यांनी सोडवले नाहीत. आजपर्यंत तुम्ही त्यांना प्रत्येक निवडणुकीत लीड देता आणि येथे प्रचाराला आल्यावर हलगी वाजवून स्वागत करता, काय म्हणावे तुम्हाला. ज्या शिगाव गावच्या पुत्राने देशासाठी बलिदान दिले. गावाचे नाव देशभर केले. त्या येथील वीर जवान रोमित चव्हाण यांचे स्मारक त्यांना उभा करता आले नाही, हे या गावचे दुर्देव आहे. हा तालुका क्रांतिकारकांचा आहे. विरोधकांनी गावा-गावात गट-तट करण्यापेक्षा पुढील पिढीला या महापुरुषांचे कार्य कळावे व त्यांचा आदर्श घेता यावा, यासाठी त्यांनी स्मारके बनवायला हवी होती. ऊसाच्या बाबतीत आता मी काही बोलायची गरज नाही. कारण तुमचे 700 रुपये कोण मारतय, हे सर्वांना समजलं आहे. या निवडणुकीत मला आशिर्वाद द्या. निवडून आल्यानंतर तुमचे अनेक वर्षांचे प्रलंबित प्रश्‍न मार्गी लावीन, हे मी यानिमित्त तुम्हाला वचन देतो.
यावेळी शिवाजी खोत, राहुल पाटील, संजय गोसावी, राजेंद्र पाटील, ओंकार नलवडे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS