कॅबिनेट बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मारली दांडीमुंबई ः मुंबई महानगरपालिकेच्या निकालानंतर राजकीय हालचालींना वेग आला असून, महापौर निवडीपर्यंतच

कॅबिनेट बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मारली दांडी
मुंबई ः मुंबई महानगरपालिकेच्या निकालानंतर राजकीय हालचालींना वेग आला असून, महापौर निवडीपर्यंतची सत्ता-समीकरणे अधिकच तीव्र झाली आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने संघटनात्मक पातळीवर महत्त्वाची रणनीती आखल्याचे दिसून येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेनेच्या सर्व निर्वाचित नगरसेवकांना वांद्रे येथील ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. महापौर निवडीपर्यंत पक्षातील एकजूट कायम ठेवणे आणि संभाव्य फोडाफोडीपासून नगरसेवकांना दूर ठेवणे, हा या निर्णयामागचा प्रमुख उद्देश असल्याचे सांगितले जात आहे.
, याच दिवशी पार पडणार्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. मात्र या बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्री अनुपस्थित राहिल्याने चर्चांना उधाण आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईत असतानाही, तर उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्यात असतानाही त्यांनी कॅबिनेट बैठकीला हजेरी लावली नाही. निवडणूक निकालांनंतरच्या राजकीय घडामोडींमुळे दोन्ही उपमुख्यमंत्री नाराज असल्याच्या चर्चा सुरू असून, त्याचा प्रभाव प्रशासकीय स्तरावरही जाणवत असल्याची चर्चा आहे. देशातील आर्थिकदृष्ट्या सर्वात समृद्ध आणि राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या बृहन्मुंबई महानगरपालिकेत तब्बल 25 वर्षांनंतर सत्तांतर घडले आहे. नऊ वर्षांनंतर झालेल्या या निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीने स्पष्ट वर्चस्व प्रस्थापित केले आहे. 227 सदस्यांच्या सभागृहात भाजपने 89 जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने 29 जागांवर विजय मिळवला आहे. त्यामुळे एकूण 118 जागांसह महायुतीने बहुमताचा 114 चा आकडा पार केला असून, आगामी काळात मुंबईचा महापौर महायुतीचाच होणार, हे जवळपास निश्चित मानले जात आहे. एकीकडे महापालिकेतील सत्ता टिकवण्यासाठी सुरू असलेली हालचाल आणि दुसरीकडे मंत्रिमंडळ बैठकीतील गैरहजेरी-या दोन्ही घडामोडी राज्याच्या राजकारणात महत्त्वाचे संकेत देणार्या ठरत आहे

COMMENTS