शासकीय इमारतीच्या छताला लागली गळती; कर्जत पंचायत समितीच्या विभागातील अधिकारी, कर्मचारी त्रस्त

HomeUncategorized

शासकीय इमारतीच्या छताला लागली गळती; कर्जत पंचायत समितीच्या विभागातील अधिकारी, कर्मचारी त्रस्त

कर्जत/प्रतिनिधी : रस्ता, पूल, बंधारे अशी अनेक शासकीय निधीतील कामे निकृष्ट दर्जाची होतात. लोकांची ओरड होते, अधिकार्‍यांकडे तक्रारी होतात, मात्र त्याचे

kopargav:विकासाचे अनुत्तरीत प्रश मार्गी लावणे माझे आद्य कर्तव्यच : आ. आशुतोष काळे| LokNews24
गुन्ह्यातील जप्त किमती मुद्देमाल ठेवणार बँक लॉकरमध्ये…; जिल्हा पोलिसांचा विचार सुरु, नियमावली केली जाणार
Ahmednagar : भाजपचा नेता आमदार रोहित पवारांच्या गोटात..राम शिंदेंना जोरदार झटका I LOK News24

कर्जत/प्रतिनिधी : रस्ता, पूल, बंधारे अशी अनेक शासकीय निधीतील कामे निकृष्ट दर्जाची होतात. लोकांची ओरड होते, अधिकार्‍यांकडे तक्रारी होतात, मात्र त्याचे पुढे काय होते ? हे सर्वश्रुत आहे. निवडणुकीच्या काळात लोकप्रतिनिधींच्या ‘टक्केवारी’ची चर्चा होते. एकमेकांचे राजकीय वस्त्रहरण करून निवडणुका जिंकल्या जातात. मात्र ठेकेदारांची पाठराखण करून लाभ मिळविण्याची पद्धती मात्र बंद होताना दिसत नाही.
गेल्या काही वर्षात कर्जत तालुक्यात कित्येक कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची झाली. त्याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. मात्र आता कर्जतमधील पंचायत समितीच्या इमारतीचे कामही निकृष्ट दर्जाचे झाल्याचे उघड होत आहे. २०१४ मध्ये बांधकाम झालेल्या इमारती गळू लागल्याने विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी त्रस्त झाले आहेत. या निकृष्ट दर्जाच्या कामाचा सर्वाधिक फटका कृषी विभागाला बसला आहे. खुर्चीवर बसल्यानंतर भिजू नये यासाठी छताच्या खाली प्लास्टिकचे कागद बांधण्यात आलेले आहेत. पाऊस सुरू झाल्यानंतर संकलित पाणी बाटल्यांमध्ये भरून बाहेर टाकावे लागते. या गळतीमुळे कार्यालयातील फर्निचरचे मोठे नुकसान झालेले आहे. कार्यालयातील कागदपत्रे जपण्यासाठी अधिकाऱ्यांना कसरत करावी लागत आहे. इमारतीला ठिकठिकाणी भेगा पडलेल्या आहेत. सात वर्षांमध्ये इमारत एवढ्या भग्नावस्थेत गेली असल्याने या बांधकामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित केला जात आहे. तालुक्‍याच्या विविध भागातून नागरिक कामानिमित्त पंचायत समितीमध्ये जातात. मात्र तेथे गेल्यानंतर दिसत असलेल्या इमारतीची दयनीय अवस्था हा चर्चेचा विषय झाला आहे. तत्कालीन बांधकाम विभागाचे अधिकारी आणि ठेकेदार यांच्यातील आर्थिक हितसंबंधामुळेच हा प्रकार पहावयास मिळत असल्याची तालुक्यात चर्चा आहे. आता वरील मजल्याचे काम तरी चांगल्या दर्जाचे करावे, ही कर्जतकरांची अपेक्षा आहे.

COMMENTS