शरद पवार आणि अमित शहा यांची भेट ही अफवा आहे – नवाब मलिक

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शरद पवार आणि अमित शहा यांची भेट ही अफवा आहे – नवाब मलिक

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार व प्रफुल पटेल यांची अहमदाबाद येथे अमित शहा यांच्यासोबत कोणतीही भेट झाली नाही ही अफवा पसरवून संभ्रम निर्माण करण्यात आला आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

पत्रकार वारिशे यांचा अपघात ठरवूनच
देशातील 10 राज्यांना केंद्राचा अलर्ट | DAINIK LOKMNTHAN
कृषी दूतांनी आडगांव येथे दिले शास्त्रीय पद्धतीने फळबाग लागवड प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन !

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार व प्रफुल पटेल यांची अहमदाबाद येथे अमित शहा यांच्यासोबत कोणतीही भेट झाली नाही ही अफवा पसरवून संभ्रम निर्माण करण्यात आला आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

गेले दोन दिवस ट्वीटरवर बातम्या पसरवण्यात आल्या आणि दिव्यभास्करमध्ये लहान बातमी करुन चॅनेलवर बातम्या दाखवायला सुरुवात करण्यात आल्या. एका पत्रकाराकडून प्रश्न विचारुन संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न स्वतः अमित शहा यांनी केला आहे असा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. ज्या बातम्या पसरवण्यात आल्या त्या खोट्या आहेत. कोणतीही भेट झालेली नाही. आणि भेटण्याचा उद्देश किंवा कारण असू शकत नाही असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.

COMMENTS