वेटरची हत्या करणाऱ्या नामदेव मामाला अटक करण्यात राहुरी पोलीसांना अपयश

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वेटरची हत्या करणाऱ्या नामदेव मामाला अटक करण्यात राहुरी पोलीसांना अपयश

देवळाली प्रवरा /प्रतिनिधी : राहुरी शहरातील हॉटेल साक्षी मधील वेटरची हत्या करून फरार असलेला फरार आरोपी स्थानिक गुन्हे शाखेने अहमदनगर येथून जेरबंद केला

बाळच्या जीवाला नगर व पारनेरला धोका…नाशिकला ठेवा ; वकिलाने केली न्यायालयाकडे मागणी, निर्णयाची प्रतीक्षा
दुष्काळजन्य परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी तातडीने बैठक घ्याः आ. काळे
अरिहंत भगवान मूर्तीच्या अखंड शिलेचे नगरमध्ये स्वागत ; सामूदायिक शांतीमंत्र पठणात पुष्पहार अर्पण

देवळाली प्रवरा /प्रतिनिधी : राहुरी शहरातील हॉटेल साक्षी मधील वेटरची हत्या करून फरार असलेला फरार आरोपी स्थानिक गुन्हे शाखेने अहमदनगर येथून जेरबंद केला आहे. मंगळवारी सकाळी पुणे बस स्थानक अहमदनगर येथुन पलायन करण्याच्या बेतात असलेला आरोपी नामदेव मामा या वेटरकाम करणाऱ्या आरोपीस एलसीबीने ताब्यात घेतले आहे.         

राहुरी येथील नगर-मनमाड महामार्गालगत  हॉटेलमध्ये साक्षी झोपलेल्या सोनू नामदेव छत्री (वय २७, रा. जोडवाडी, ता. गेवराई, जि. बीड) याची हत्या झाल्याची घटना घडली होती. त्याच्या सोबत असणारा दुसरा वेटर नामदेव केशव दराडे (वय ३०, रा. बोधेगाव, ता. शेवगांव) हा घटना घडल्यापासून फरार होता. या फरार वेटरवर पोलिसांचा संशय होता त्याच्या शोधार्थ पोलिसांनी पथके रवाना केली होती.त्यादृष्टीने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक देखील रवाना झालं होतं स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला अहमदनगर येथील बसस्थानकातुन ताब्यात घेतला आहे. राहुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस जेरबंद करण्यात राहुरी पोलीसांना अपयथ आले.राहुरी अनेक गुन्ह्यातील आरोपी एलसीबीने शिताफीने पकडले असल्याने राहुरी पोलीसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे.स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली सोमनाथ दिवटे ,गणेश इंगळे, सोपान गोरे,मनोहर गोसावी,  विश्वास बेरड,दत्तात्रेय इंगळे, सुनील चव्हाण, दीपक शिंदे,शंकर चौधरी,रवी सोनटक्के,सागर ससाने,शिवाजी ढाकणे, रवींद्र घुंगासे ,रवींद्र गायकवाड, रोहित यमुल, विनोद मासाळकर, मच्छिंद्र बर्डे आदिंच्या पथकाने हि कामगिरी केली आहे.

COMMENTS