वीज वापरावर लक्ष ठेवा,’वर्क फ्रॉम होम’मुळे वापर वाढण्याची शक्यता

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वीज वापरावर लक्ष ठेवा,’वर्क फ्रॉम होम’मुळे वापर वाढण्याची शक्यता

कोरोना विषाणूचा वाढता उद्रेक त्यामुळे ब्रेक द  चेन करण्यासाठी सरकारने राज्यात व जिल्ह्यात लागू करण्यात आलेली संचारबंदी व निर्बंध त्यामुळे बहुतांश खासगी व शासकीय कर्मचारी  घरून करीत असलेले काम (वर्क फ्रॉम होम) आणि तापमानाचा वाढता पारा यामुळे घरगुती वीज ग्राहकांच्या वीज वापरात  वाढ होण्याची शक्यता आहे. 

नगरमध्ये किराणा दुकानातून 18 हजाराच्या तांदळाची चोरी
जिल्ह्याच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : डॉ. सुजय विखे
भावी पिढीने संशोधन, कौशल्यावर भर द्यावा ः डॉ. गाडेकर

अहमदनगर : कोरोना विषाणूचा वाढता उद्रेक त्यामुळे ब्रेक द  चेन करण्यासाठी सरकारने राज्यात व जिल्ह्यात लागू करण्यात आलेली संचारबंदी व निर्बंध त्यामुळे बहुतांश खासगी व शासकीय कर्मचारी  घरून करीत असलेले काम (वर्क फ्रॉम होम) आणि तापमानाचा वाढता पारा यामुळे घरगुती वीज ग्राहकांच्या वीज वापरात  वाढ होण्याची शक्यता आहे. 

 यासाठी महावितरणच्या ग्राहकांना www.mahadiscom.in या संकेतस्थळावर वीज वापरानुसार संभाव्य वीजबिलाचा अंदाज पाहण्यासाठी बिल  कॅल्क्युलेटर  (गणक) उपलब्ध असून  घरातील वीज वापरावर लक्ष ठेवून अनावश्यक वीज वापर टाळता येऊ शकतो. वीज ग्राहकांनी आपल्या वीज वापरावर लक्ष व नियंत्रण ठेवावे आणि मीटर रीडिंग शक्य नसलेल्या ठिकाणी मोबाईल रीडिंगचा फोटो पाठवून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे.   

कोरोना विषाणूचा वाढता प्रादूर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने  संचारबंदी लागू करून नागरिकांना घरातच राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच ऊन्हाच्या तीव्रतेसोबत तापमानाचा पाराही वाढत असल्याने गारवा निर्माण करण्यासाठी पंखे,  वातानुकूलित  यंत्रणा, टीव्ही, संगणक वा लॅपटॉप  आदींचा वापर सुद्धा वाढत आहे. घरीच राहणारे नागरिक, घरातून काम करणारे कर्मचारी व वाढते तापमान यामुळे घरगुती ग्राहकांच्या वीज वापरातील वाढ अनिवार्य ठरणार आहे. यामध्ये पंखे व कुलरचा वापर १८ ते २४ तास होण्याची शक्यता आहे. 

 वीज बिलाच्यामागे  वर्गवारीनिहाय वीज देयकाचे प्रती युनिट दर दिलेले असतात त्यामध्ये ० ते १००, १०१ ते ३००, ३०१ ते ५०० व ५०१ ते १००० युनिट संदर्भातील दर छापलेले असतात.त्यामुळे एखाद्या महिन्यात जास्त वीज  युनिट वापरल्यास त्याचे दरही त्या तुलनेत वाढत असतात.घरात विजेचा वापर करताना आयएसआय प्रमाणित तारांचा तसेच उर्जा बचतीचे प्रमाणपत्र लाभलेल्या व स्टार लेबल असलेल्या उपकरणांचा वापर करावा.  उपकरणांचे वॅट, त्याचा दैनदिन वापर याची माहिती घेतल्यास विजेच्या वापरावर लक्ष ठेवून नियोजन केल्यास वीज बिल कमी करता येईल,व आलेले वीज बिल एवढे का? याचा उलगडा नक्की होईल. यासाठी  www.mahadiscom.in या संकेतस्थळावर वीज वापरानुसार संभाव्य वीजबिलाचा अंदाज पाहण्यासाठी बिल कॅल्क्युलेटर  (गणक) उपलब्ध आहे.   या सर्व बाबींची माहिती घेतल्यास व स्वत:च ऑडिट केल्यास वीज बचत करणे सोपे होईल व वापरलेल्या वीजेचे बिल भरताना गैरसमज होणार नाही. ग्राहकांनी घरातील दैनंदिन वीज वापरावर लक्ष ठेवण्यासह मीटरवरील रीडिंगचे निरिक्षण करावे. महावितरणला मीटर रिडींग घेणे शक्य न झाल्यास मोबाईल अ‍ॅपच्याद्वारे मीटर रिडींग पाठविता येईल तसेच प्राप्त वीज देयक घरबसल्या  महावितरणचे संकेतस्थळ वा मोबाईल अ‍ॅपच्या द्वारे  ऑनलाईन भरून ग्राहकांनी सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. 

COMMENTS