‘विभाजन विभाषिका स्मृती दिवस’ पाळणार : पंतप्रधान

Homeताज्या बातम्यादेश

‘विभाजन विभाषिका स्मृती दिवस’ पाळणार : पंतप्रधान

नवी दिल्ली : पंतप्रधानांनी ट्विट करत 14 ऑगस्ट हा दिवस फाळणीच्या वेदनांचं स्मरण करण्यासाठी 'विभाजन विभाषिका स्मृती दिवस' म्हणून पाळला जाईल, अशी घोषणा

बंडाच्या स्वल्पविरामाला अंकूर फुटेल?
प्रधानमंत्री मातृवंदना योजनेंतर्गत महाराष्ट्रात २४ लाख लाभार्थ्यांची नोंद
जातीनिहाय जनगणनेबाबत लवकरच निर्णय घेऊ : पंतप्रधान मोदींचे आश्‍वासन

नवी दिल्ली : पंतप्रधानांनी ट्विट करत 14 ऑगस्ट हा दिवस फाळणीच्या वेदनांचं स्मरण करण्यासाठी ‘विभाजन विभाषिका स्मृती दिवस’ म्हणून पाळला जाईल, अशी घोषणा केली आहे. या कृतीमुळे देशातील भेदभावाचे विष कमी होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे. भारताच्या फाळणीचा इतिहास रक्तरंजित आहे. 14 ऑगस्ट 1947 रोजी झालेल्या या फाळणीमध्ये हजारो लोकं मारले गेले. तसेच लाखो जणांना आपले घर-दार सोडून अंगावरच्या कपड्यासह विस्थापित व्हावे लागल होते. देशाच्या फाळणीची वेदना विसरणे अशक्य आहे. द्वेष आणि हिंसा या कारणामुळे आपल्या लाखो भावंडांना विस्थापित व्हावे लागले. अनेकांनी जीव गमावला. त्यांचा संघर्ष आणि आठवण म्हणून 14 ऑगस्ट हा दिवस विभाजन विभाषिका स्मृती दिवस म्हणून पाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
हा दिवस आपल्याला भेदभाव, वैमनस्य, आणि दुर्भावना याचे विष संपवण्यासाठी प्रेरणा देईल. त्याचबरोबर एकता, सामजिक सलोखा आणि मानवी संवेदना देखील यामुळे मजबूत होईल, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. ब्रिटीशांनी 1947साली भारत सोडताना देशाची फाळणी केली. मुस्लीम बहुल पाकिस्तान या नव्या देशाची निर्मिती त्यांनी केली. त्यानंतर इतिहासातील सर्वात मोठे विस्थापन झाले. त्या घटनेच्या वेदना आजही जिवंत आहेत देशभरात सध्या भारताच्या 75 व्या स्वातंत्र्य दिनाच्या उत्साहाला सुरुवात झाली आहे. मात्र भारताच्या स्वातंत्र्य दिनापूर्वी पाकिस्तान एक दिवस आधी म्हणजे 14 ऑगस्टला त्यांचा स्वातंत्र्य दिन साजरा करतो. पाकिस्तानच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशेष ट्विट केलं आहे. फाळणीचं दु:ख विसरु शकत नाही. या फाळणीत बळी गेलल्या लोकांच्या आठवणीत 14 ऑगस्टचा दिवस ‘विभाजन विभीषिका’ स्मृती दिवस म्हणून साजरा केला जाईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. इंग्रजांपासून भारताला मिळालेले स्वातंत्र आणि भारताची फाळणी हे एकाचवेळी झाले. या फाळणीवेळी धर्माच्या नावाने हिंसाचार झाला होता. यामध्ये अनेक बळी गेले होते. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्विटमध्ये म्हणतात, ‘देशाच्या फाळणीचे दु:ख कधीही विसरले जाऊ शकत नाही. तिरस्कार आणि हिंसेमुळे आमच्या लाखो बंधू-भगिनी स्थलांतरित व्हावे लागले. काहींना तर प्राण गमवावे लागले. त्या लोकांचा संघर्ष आणि बलिदानाच्या आठवणीत 14 ऑगस्ट हा दिवस फाळणीची दु:खद आठवण अर्थात ‘विभाजन विभीषिका स्मृती दिवस’ म्हणून आठवला जाईल, असे ट्विट मोदींनी केलेय. हा दिवस आपल्याला भेदभाव, वैमनस्य आणि तिरस्काराचं विष संपवण्यासाठी केवळ प्रेरितच करणार नाही तर यामुळे एकता, सामाजिक सद्भाव आणि मनुष्याच्या संवेदना आणखी मजबूत होतील, असे नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

COMMENTS