विनयभंगाचे खोटे गुन्हे दाखल करणे ही तर आमदारांची जुनी सवय :  किरण काळे

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विनयभंगाचे खोटे गुन्हे दाखल करणे ही तर आमदारांची जुनी सवय : किरण काळे

अहमदनगर/प्रतिनिधी : काल काँग्रेस पदाधिकार्‍यांच्या टीमने एमआयडीसीतील बहुचर्चित तथाकथित आयटी पार्कला भेट घेऊन राष्ट्रवादीच्या आमदारांच्या खोट्या कारभा

भिल्ल समाज स्मशानभूमी अतिक्रमण प्रकरणी कार्यवाही करा
कोपरगाव नगरपरिषदेने काढली स्वच्छता जागृती फेरी
Shevgoan :नदीवरील पाण्याचा अंदाज न आल्याने ट्रकसह चालक गेला वाहून l LokNews24

अहमदनगर/प्रतिनिधी : काल काँग्रेस पदाधिकार्‍यांच्या टीमने एमआयडीसीतील बहुचर्चित तथाकथित आयटी पार्कला भेट घेऊन राष्ट्रवादीच्या आमदारांच्या खोट्या कारभाराची पोलखोल केली. त्यावर त्यांच्या पायाखालची वाळू सरकली. यामुळेच माझ्यावरती काल मध्यरात्री विनयभंगाचा खोटा गुन्हा त्यांनी दाखल केला आहे. नगरकरांसाठी, नगर शहरातल्या तरुणाईसाठी मी अग्नी परिक्षेला सामोरे जायला सर्वतोपरी तयार असून आज दिनांक ३ सप्टेंबर २०२१ रोजी दुपारी १२.१५ वाजता जाहीर पत्रकार परिषदेमध्ये काल आयटी पार्क मध्ये नेमके खरे काय घडले याची ऑडिओ व्हिडिओ सह सीडी वाजवणार असल्याची घोषणा शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केली आहे. 
राष्ट्रवादीच्या आमदारांनी नगर शहरातील तरुण त्यांचे पालक आणि मतदारांची आयटी पार्क सुरू करतो, हजारो मुलांना नोकरी देतो असे म्हणून फसवणूक केली. याबद्दल आयटी पार्कला प्रत्यक्ष भेट देत पाहणी करत याबाबत वास्तव नगरकरांच्या समोर मांडले होते. या संदर्भातील बातम्या काल दुपारपासून समाज माध्यमांवर व्हायरल झाल्या होत्या.  त्यानंतर अचानकपणाने सूत्रे हलू लागली. रात्री उशिरापर्यंत सर्व प्रकार सुरू होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पक्षाचे पदाधिकारी स्वतः एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये ठाण मांडून होते. त्यानंतर रात्री उशिरा किरण काळे यांच्या सह सात ते आठ जणांविरुद्ध  विनयभंगासह इतर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याबाबत खरं नेमकं काय घडलं याचं लाईव्ह फुटेज काँग्रेसच्या वतीने पत्रकारांना दाखविण्यात येणार असून त्यासाठी किरण काळे यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली असल्याची माहिती शहर काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अनंतराव गारदे यांनी दिली आहे. 

COMMENTS