संगमनेर ( प्रतिनिधी ) संगमनेरमध्ये नुकतेच माजी मंत्री राधाकृष्ण विखे यांनी शक्तीप्रदर्शन करत मेळावा घेतला होता. आता महसूलमंत्री बाळासाहेब थोरात ह
संगमनेर ( प्रतिनिधी )
संगमनेरमध्ये नुकतेच माजी मंत्री राधाकृष्ण विखे यांनी शक्तीप्रदर्शन करत मेळावा घेतला होता. आता महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे सुद्धा मेळावा घेणार आहेत.
देशासाठी आदर्शवत ठरलेल्या संगमनेरच्या सहकार पंढरीतील विविध सहकारी शिखर संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा राज्याचे महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात व आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या उपस्थितीत रविवार दिनांक 26 सप्टेंबर 2021 रोजी ऑनलाइन पद्धतीने सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावरील अमृतेश्वर मंदिराच्या प्रांगणात होणार आहे.
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर यावर्षीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा या ऑनलाईन पद्धतीने होणार असून सर्व सहकारी संस्थांच्या सभासदांना या बाबदचे अहवाल पाठवण्यात आले आहे. तसेच या सभांमध्ये सहभागी होण्यासाठी सर्वांना ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावरील अमृतेश्वर मंदिराच्या प्रांगणात ऑनलाईन पद्धतीने या वार्षिक सर्वसाधारण सभांचे आयोजन करण्यात आले आहे.
यामध्ये रविवार दिनांक 26 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 10 वा. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा कारखान्याचे अध्यक्ष बाबासाहेब ओहोळ यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. तर सकाळी 11:30 वाजता संगमनेर शेतकी सहकारी संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा अध्यक्ष शिवाजीराव थोरात यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. दुपारी 12.30 वा. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा बँकेचे चेअरमन अमित पंडित यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
यानंतर दुपारच्या सत्रात दुपारी 3 वा. संगमनेर तालुका सहकारी दुध उत्पादक व प्रक्रिया संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. तर सायं. 4.30 वा. गरुड कुकूटपालन या व्यवसायिक संस्थेची वार्षिक सभा राजेंद्र कडलग यांच्या अध्यक्षतेखाली आणि सायं. 5 वा. हरिचंद्र सहकारी पाणीपुरवठा फेडरेशन संस्थेची वार्षिक सभा राजेंद्र गुंजाळ यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
सभासदांना ऑनलाइन प्रणालीने यामध्ये सहभाग घेता येणार आहे. या विविध सभांसाठी शेतकरी विकास मंडळाचे अध्यक्ष बाजीराव पा. खेमनर, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष माधवराव कानवडे, नगराध्यक्ष सौ दुर्गाताई तांबे, इंद्रजीतभाऊ थोरात, सत्यजित तांबे, शंकरराव पा. खेमनर, सभापती सौ सुनंदाताई जोर्वेकर यांसह सर्व पदाधिकारी व मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
तरी या वार्षिक सर्वसाधारण सभांमध्ये सभासदांनी ऑनलाइन पद्धतीने उपस्थित राहावे असे आवाहन कारखान्याचे उपाध्यक्ष संतोष हासे, दूध संघाचे उपाध्यक्ष साहेबराव गडाख, शेतकी संघाचे उपाध्यक्ष संपतराव डोंगरे, अमृतवाहिनी बँकेचे उपाध्यक्ष दत्तात्रय खुळे, यांचे सह सर्व सहकारी संस्थांच्या संचालक मंडळाने व कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, डॉ प्रतापराव उबाळे, अनिल थोरात, रमेश थोरात, बाळासाहेब उंबरकर, मंगेश सांगळे यांनी केले आहे.
COMMENTS