वाळू पकडायला गेले आणि दमदाटी अनुभवली

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वाळू पकडायला गेले आणि दमदाटी अनुभवली

अहमदनगर/प्रतिनिधी : वाळू चोरी पकडण्यासाठी गेलेल्या तलाठी व होमगार्डला दमदाटीचा अनुभव आला. श्रीगोंदे तालुक्यात ही घटना घडली. श्रीगोंदा तालुक्यातील अजन

पुन्हा एकदा महायुतीचा झेंडा फडकविणारच ः मुख्यमंत्री शिंदे
वाडिया पार्कमध्ये रंगणार छत्रपती शिवराय राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा
आ. रोहित पवार यांनी घेतली कुकडीच्या पाणी नियोजनाची बैठक

अहमदनगर/प्रतिनिधी : वाळू चोरी पकडण्यासाठी गेलेल्या तलाठी व होमगार्डला दमदाटीचा अनुभव आला. श्रीगोंदे तालुक्यात ही घटना घडली. श्रीगोंदा तालुक्यातील अजनुज ते देऊळगाव येथील नदीपात्रात वाळू उपसा होत असल्याची माहिती गौण खनिज पथकातील नायब तहसीलदार खातले यांना मिळताच अजनुज ते वडगाव दरेकर (ता.दौंड) येथे मध्यरात्री एकच्या सुमारास ते स्वतः तसेच तलाठी सचिन प्रभाकर बळी व अक्षय काळे नावाचा होमगार्ड घटनास्थळी गेले. मात्र, वाळू तस्करांनी महसूलचे अधिकारी येत असल्याची चाहूल लागताच पळ काढण्याचा प्रयत्न केला. तरीही तलाठी व होमगार्ड यांनी वाळूचा एक ट्रक पकडला. त्यामध्ये 5 लाख रुपये किमतीचा हायवा ट्रक (नंबर एमएच 42 एक्यु 8883) व 26 हजार रुपये किमतीची सुमारे 4 ब्रास वाळू असा एकूण 5 लाख 26 हजार रुपयांचा मुद्देमाल पकडला. त्यातील ट्रकमध्ये होमगार्ड काळे यास बसवून तो तहसीलदार कार्यालयात नेण्यास सांगितले असता ड्रायव्हर अक्षय डाळिंबे तसेच हायवाचे मालक यांनी खातले व होमगार्ड अक्षय काळे यांना शिवीगाळी दमदाटी करुन तसेच धक्काबुक्की व मारहाण करुन हायवा गाडीमधून खाली उतरण्यास भाग पाडले व गाडी घेऊन पसार झाले. त्यामुळे तलाठी सचिन बळी यांना मोकळ्या हाताने परत यावे लागले. या प्रकरणी श्रीगोंदा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

COMMENTS