शनिवार (दि.२९) रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास आलेल्या वादळी वाऱ्याने कोपरगाव नगरपालिका शाळा नंबर ५ बेट शाळेचे पत्रे उडाले. या घटनेमुळे शाळेचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.
कोपरगाव / ता.प्रतिनिधी :शनिवार (दि.२९) रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास आलेल्या वादळी वाऱ्याने कोपरगाव नगरपालिका शाळा नंबर ५ बेट शाळेचे पत्रे उडाले. या घटनेमुळे शाळेचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.
कोपरगाव बेट परिसरात शनिवारी (दि. २९) दुपारी जोरदार वादळी वारे वाहण्यास सुरुवात झाली वादळामुळे नगरपालिका शाळा नंबर ५ चे उत्तरेकडील एक वर्ग खोलीचे संपूर्ण पत्रे सांगाड्यासह उडून दक्षिणेकडील पत्र्याच्या इमारतीवर पडले यात वर्गखोली च्या भिंतीचे अंशतः व छताचे संपूर्ण नुकसान झाले आहे घटनेची माहीती कळताच शाळेचे मुख्याध्यापक विलास माळी ,व सुनिल रहाणे यांनी घटनास्थळी धाव घेऊन फर्निचर व शैक्षणिक साहित्य स्थानिकांच्या मदतीने सुरक्षित हलवीले.सदर ठिकाणी नगरसेवक अनिल आव्हाड ,श्री आरणे , स्वच्छता दुत सुशांत घोडके व प्रशांत शिंदे यांनी भेट देत पाहणी कैली यासंबंधी शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी मोहनीश तुंबारे यांनी नुकसानीची चौकशी करून मार्गदर्शन केले या शाळेची इमारत जुनी असून शाळा स्थापन होऊन १०४ वर्षे झाली आहे सदर इमारत ही मारुती देवस्थान ट्रस्ट बेट यांची आहे तरी शाळेची नवीन इमारत व्हावी ही पालकांची मागणी आहे तहसिलदार योगैश चंद्रे व नगरपालिका शिक्षण मंडळ यांना सदर घटनेची माहिती देण्यात आली तर तहसिलदार यांच्या आदेशाने कामगार तलाठी श्री .तांगडे यांनी तत्काळ झालेल्या नुकसानीचा पंचनामा केला
COMMENTS