वाझे यांनी नष्ट केलेले पुरावे एनआएच्या हाती

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वाझे यांनी नष्ट केलेले पुरावे एनआएच्या हाती

उद्योजक मनसुख हिरेन मृत्यू आणि उद्योगपती मुकेश अंबानी धमकी प्रकरणातील पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाल्यानंतर तेच पुरावे पुन्हा शोधण्याची मोहीम एनआयएतर्फे सुरू आहे.

राजेश शाह यांची शिवसेनेतून हकालपट्टी
Yeola : आशा स्वयंसेविका गटप्रवर्तक भविष्य मानधनाचा विचार करणार
डोंबिवली स्टेशन परिसरातील फेरीवाल्यांच्या विरोधात मनसेचे आमदार उतरले रस्त्यावर

मुंबई/प्रतिनिधी: उद्योजक मनसुख हिरेन मृत्यू  आणि उद्योगपती मुकेश अंबानी  धमकी प्रकरणातील पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाल्यानंतर तेच पुरावे पुन्हा शोधण्याची मोहीम एनआयएतर्फे सुरू आहे. मिठी नदीत काही पुरावे नष्ट केल्याची माहिती एनआयएला मिळाली होती. त्यानंतर एनआयएने या नदीमध्ये शोधमोहीम राबवली. बीकेसी येथील मिठी नदीतून संगणकाचे काही सुटे भाग, डीव्हीआर तसेच इतर साहित्य बाहेर काढण्यात बाहेर आले आहे. हा मोठा ऐवज हाती लागल्यानंतर आता मनसुख हिरेन मृत्यू आणि मुकेश अंबानी धमकी प्रकरणाचा उलगडा लवकर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

अंबानी धमकी प्रकरण आणि हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूनंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली. या प्रकरणात निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे यांचे नाव समोर आल्यानंतर तर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. सध्या या दोन्ही प्रकरणांचा तपास एनआयए करत असून रोज नवनवे गाैप्यस्फोट होत आहेत. या दोन्ही प्रकरणांशी निगडीत असलेले सर्व पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाल्याचेही या तपासात समोर आले. हेच पुरावे शोधण्याच्या प्रयत्नात आता एनआयएच्या हाती काही ठोस गोष्टी लागल्या आहेत. या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी उपयुक्त  ठरणारे डीव्हीआर, संगणकाचा सीपीयू आणि इतर काही गोष्टी एनआयएला सापडल्या आहेत. मिठी नदीत ही शोधमोहीम राबवण्यात आली. यावेळी एनआयएच्या अधिकाऱ्यांसोबत सचिन वाझे हेसुद्धा उपस्थित होते.

हिरेन यांचा मृत्यू तसेच मुकेश अंबानी यांना धमकी दिल्याचा प्रकार घडल्यानंतर  या दोन्ही प्रकाराशी निगडीत असलेले अनेक पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाला. तसेच या प्रकरणांच्या तपासासाठी मदत होणारे सीसीटीव्ही फुटेज साठवलेला डीव्हीआर, तसेच संगणकाचा सीपीयू नष्ट नदीत फेकण्यात आला होता. वाझे यांचे घर असलेल्या साकेत काँम्प्लेक्स या सोसायटीतील डीव्हीआरसुद्धा गायब होता. त्यानंतर एनआयएने तपास मोहीम राबवत गायब असलेले डीव्हीआर शोधण्याचा प्रयत्न केला. या वेळी मिठी नदीत एनआयएला डीव्हीआर आणि इतर सामान सापडले आहे. सचिन वाझे यांना घटनास्थळी नेऊन डिव्हीआर शोधण्यात आला. दरम्यान, डीव्हीआर आणि सीपीयून सापडल्यामुळे एनआयएचे हे मोठे यश असून या दोन्ही प्रकरणांची लवकर उकल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

COMMENTS