वाचाळवीरांना मुसके बांधण्याची गरज!

Homeसंपादकीयदखल

वाचाळवीरांना मुसके बांधण्याची गरज!

अपघाताने सत्तेवर आलेले महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्षाची मुदत पार करणार की आधीच कोसळून मुदतपुर्व निवडणूकीला सामोरे जावे लागणार याविषयी विविध प्रकारा

हिंदूंनो, हिंदूत्वापासून सावध व्हा !
नेत्याअभावी नागरिकांच्या मुलभूत अधिकारावर गदा !
विषाणू काळातील अमानवीयता !

अपघाताने सत्तेवर आलेले महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्षाची मुदत पार करणार की आधीच कोसळून मुदतपुर्व निवडणूकीला सामोरे जावे लागणार याविषयी विविध प्रकाराच्या अटकळी बांधल्या जात आहेत.अर्थात या अटकळींना सत्ताधारी पक्षातील वाचाळवीरांची वक्तव्ये कारणीभूत आहेत.वास्तविक तीन पक्षांचे सरकार एकत्र असले तरी प्रत्येक पक्षाला आपले हातपाय पसरण्याचे स्वातंत्र आहे ही साळसुदपणे सारेच विसरत असल्याने हा गोंधळ निर्माण होतो.
महाविकास आघाडी सरकार महाराष्ट्रात चांगले काम करीत असतांना अधूनमधून हे सरकार राहणार की जाणार याविषयी गंभीर चर्चा ऐकायला मिळते.उलाटसुलट वक्तव्यानंतर पुन्हा धुराळा खाली बसतो आणि सरकार पाच वर्ष पुर्ण करणार असल्याची ग्वाही दिली जाते.सत्ता गेली तरी चालेल. स्व-बळाचा नारा महत्वाचा,या अहमहिकेतून हा गोंधळ निर्माण होत असल्याने घटक पक्षांनी आपला अधिकार जपतांना वाचाळवीरांना मुसके घालण्याची वेळ आली आहे.तीन पक्षांच्या आघाडीत काँग्रेसला दुय्यम दर्जा दिला जात असल्याचा न्यूनगंड नाना पटोले यांच्यासारख्या अस्वस्थ मानसिकतेच्या नेत्यांना सतावत आहे.मात्र भाजपाला सत्तेपासून दुर ठेवण्याच्या एककलमी समान उद्देशाला काँग्रेसने पाठींबा दिल्यानंतर त्यांच्या आक्रमक भुमिकेमुळे अन्य घटक पक्षांमध्ये अस्वस्थता निर्माण होणार नाही,याची खबरदारी काँग्रेस नेतृत्वाला घ्यावी लागणार आहे.
काँग्रेस पक्षाचा 135 वर्षांचा इतिहास विविध घटनाक्रमांनी भरगच्च राहिला आहे. स्वातंत्र्य आंदोलनातील कँग्रेस पक्षातील नेत्यांची भूमिका ही देशप्रेमाची आणि बलिदानाची होती. या पक्षातील पंतप्रधान पदावर बसलेले पहिले व्यक्ती म्हणून पंडित जवाहरलाल नेहरूंची प्रतिमा जगातील राजकीय व्यक्तिंमध्ये गणली जाते. देशाच्या औद्योगिक जडणघडणीत नेहरूंच्या धोरणांना विसरता येणार नाही. देशात ब्रिटीश साम्राज्यात टाचणीही बनत नसतांना एका विशिष्ट उंचीवर भारताची प्रतिमा निर्माण करण्याचे काम पंडित नेहरूंच्या कार्यकाळात झाले, हे मान्य करावेच लागेल. औद्योगिक क्रांतीसोबत सिंचनाचे प्रकल्प, देशाची संरक्षण शक्ती, कृषि मालाची आयात-निर्यात, दळण-वळणाची साधने या प्रमुख बाबींकडे लक्ष दिल्याने भारताची ताकद वाढली. त्यानंतर आलेल्या प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी जागतिक पातळीवर देशाची प्रतिमा निर्माण केली. चीन युध्दाचा अनुभव पाठीशी असल्याने पाकिस्तानची फाळणी करून स्वतंत्र बांगला देशाची निर्मिती ही इंदिराजींच्या ‘आयर्न लेडी’ या भुमिकेवर शिक्कामोर्तब करणारी आहे. अखंड भारतासाठी खलिस्तान, बोडोलॅन्ड सारखी दिर्घकाळ चाललेली आंदोलने इंदिरा गांधींनी संयमाने हाताळली. शेवटी अखंड भारतासाठी त्या शहीद झाल्यात हा इतिहास आहे. त्यानंतर पंतप्रधानपदी आलेल्या राजीव गांधींनी देशाला विज्ञान-तंत्रज्ञानाच्या शिखरावर नेऊन पोहचविले. आज भारत तंत्रज्ञान व प्रोद्योगिकीच्या क्षेत्रात केवळ राजीव गांधींच्या अ‍ॅडव्हान्स टेक्नालॉजीच्या धोरणामुळे अग्रेसर आहे. त्यामुळे देशात लाखो तरूण आज आयटी क्षेत्रात काम करीत आहेत ते केवळ राजीव गांधीच्या स्पेस टेक्नॉलॉजीच्या भुमिकेमुळेच. त्यानंतर काँग्रेसचे प्रधानमंत्री म्हणून जे सलग दहा वर्ष या देशाच्या प्रधानमंत्री पदावर होते. त्या डॉ. मनमोहन सिंग यांनी देशाची अर्थव्यवस्था सांभाळली. अत्यंत संयमी भुमिकेतून त्यांनी जगात आर्थिक मंदीची लाट आलेली असतांना भारताला त्यापासून वाचविण्याचे धोरण स्विकारले. झुंडशाही व अखलाख सारखे मृत्यू, सामाजिक विषमता जातीय कटूता असे प्रकार होवू न देता ‘राष्ट्रीय एकात्मता’ आणि सर्वधर्म समभाव या धोरणातून देशाचे नेतृत्व सांभाळले. प्रादेशिक पक्षांची ताकद देशात वाढत असतांना कुणालाही ईडी, सीडी लावण्याचे प्रकार सीबीआय, एनआयए सारख्या संस्थांच्या राजकीय वापर देखील काँग्रेस पक्षातील नेतृत्वांनी केला नाही. परंतू अशा पक्षाला ज्या पक्षाने या देशाला अखंड ठेवण्यासाठी बलिदान दिले, देशाच्या सामर्थ्यशाली बनविण्यासाठी अनेक योजना निर्माण केल्या, धरणे उभारली, संरक्षण व्यवस्था मजबूत केली, अशा पक्षाच्या योगदानाला विसरून सोनिया गांधी यांच्यावर ‘विदेशी’ असल्याचा शिक्का व राहुल गांधी यांना प्रधानमंत्री होवू न देण्याचे ‘राजकारण’ केवळ शरद पवार यांनी खेळले हा इतिहास झाला. राष्ट्रवादी पक्षाची स्थापना झाली.त्यानंतरच्या घडामोडी रंजक आहेत.ज्या मुद्यावर राष्ट्रवादीचा जन्म झाला त्या मुद्याला बगल देऊन तेच शरद पवार विदेशी मुलक सोनिया गांधींच्या नेतृत्वाखालील काँग्रेससोबत अनेकदा सत्तेचे राजकारण केले. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारचा प्रयोग करताना शरद पवार यांनी काँग्रेसला सोबत घेतले.२०१४ चा काँग्रेसमुक्त भारत हा नारा भाजपने दिला असला तरी तत्पूर्वी शरद पवार यांनी जी भूमिका स्विकारली ती काँग्रेस पक्षाचे अस्तित्व कमी करण्यासाठी महत्वपूर्ण मानली जाते.तरीही बदलल्या राजकीय परिस्थितीचा विचार करता शरद पवार यांनी घेतलेली विद्यमान भुमिका काँग्रेसला फायदेशीर ठरू शकते.राज्यातील काँग्रेस पक्षाची दयनीय स्थिती बदलायची असेल तर ‘सत्ता गेली तरी चालेल’, परंतू नाना पटोलेंच्या स्वःबळाच्या आक्रमक भूमिकेला दिल्लीतील हायकमांडने लगाम गाघालण्याची गरज आहे. देशातील 20 राज्यातून काँग्रेसची सत्ता संपली. अजून एक राज्य गेले तरी बेहेतर, परंतू राष्ट्रवादीच्या दावणीला बांधून काँग्रेसने आता स्वत:चे अस्तित्व संपवून घेण्याची भूमिका स्विकारू नये ही काही मंडळींची भुमिका काँग्रेससाठी आत्मघात ठरू शकते.

COMMENTS