वर्ल्ड बॉक्‍सिंग चॅम्पियनशिपसाठी पुण्यातील आकाश गोरखाची निवड

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वर्ल्ड बॉक्‍सिंग चॅम्पियनशिपसाठी पुण्यातील आकाश गोरखाची निवड

आंतरराष्ट्रीय खेळाडू गोरखा याची वर्ल्ड बॉक्‍सिंग चॅम्पियनशिपसाठी भारतीय संघात निवड करण्यात आली आहे.

केरळमध्ये मान्सूनचे आगमन
संघटक नसलेल्या राजकीय नेत्यांची गोची..!
विधानपरिषद निवडणुकीत महायुतीचा वरचष्मा

पुणे : आंतरराष्ट्रीय खेळाडू गोरखा याची वर्ल्ड बॉक्‍सिंग चॅम्पियनशिपसाठी भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. ही स्पर्धा पोलंड येथे दि. 10 एप्रिल ते 24 एप्रिलपर्यत होणार आहे. यापूर्वी आकाश गोरखाने आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी करत सुवर्ण आणि रौप्य पदक जिंकलेले आहे. 

वर्ल्ड बॉक्‍सिंग चॅम्पियनशिपसाठी साईकडून रोहतक हरयाणा येथे नुकतीच निवड चाचणी घेण्यात आली. या निवड चाचणीत आंतरराष्ट्रीय खेळाडू आकाश गोरखा हा 60 किलो वजनी गटातून पात्र ठरला आहे. या स्पर्धेसाठी भारताच्या पुरूष आणि महिला संघात प्रत्येकी 10-10 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी आकाशने कसून सराव केला असून तो लवकरच पोलंडला रवाना होणार आहे. आकाश गोरखा हा सध्या आर्मी स्पोर्टस्‌ इंन्स्टिट्यूट आयएसआय येथे सराव करत आहे. त्याला एमआयजीएस बॉक्‍सिंग क्‍लबचे प्रशिक्षक उमेश जगदाळे हे प्रशिक्षण देत असून राष्ट्रीय खेळाडू जयदीप नीलवर्ण यांचे मार्गदर्शन मिळत आहे.

COMMENTS