वर्धन कारखाना सप्टेंबरमध्ये सुरू करणार :कदम

Homeमहाराष्ट्रशहरं

वर्धन कारखाना सप्टेंबरमध्ये सुरू करणार :कदम

औंध:-गत गळीत हंगामात शेतकऱ्यांचा कारखान्यावर असणारा विश्वास,अधिकारी व कर्मचारी यांनी घेतलेल्या अथक परिश्रमामुळे हंगाम यशस्वी पार पडला.यंदाच्या गळीत ह

मधुमेह व उच्चरक्तदाब यामुळे किडनीविकारात वाढ :  डॉ. देवीकुमार केळकर
लालपरी जागी खासगी गाड्या फलाटावर; सांगली जिल्ह्यातील प्रकाराने महामंडळाचे वाभाडे
म्हाडाच्या इमारतीला आग, 135 नागरिकांची सुटका

औंध:-गत गळीत हंगामात शेतकऱ्यांचा कारखान्यावर असणारा विश्वास,अधिकारी व कर्मचारी यांनी घेतलेल्या अथक परिश्रमामुळे हंगाम यशस्वी पार पडला.यंदाच्या गळीत हंगामात कारखाना लवकर सुरू करण्यासाठी आवश्यक कामे वेळेत पूर्ण करून सप्टेंबर मध्ये कारखाना शेतकऱ्यांच्या सेवेसाठी सुरू करणार असल्याचे प्रतिपादन वर्धन अँग्रोचे चेअरमन धैर्यशील कदम यांनी केले.                 

वर्धन अँग्रो कारखाना कार्यस्थळावरती धैर्यशील कदम यांच्या शुभहस्ते गळीत हंगाम २०२१-२२ चा रोलर पूजन प्रसंगी ते बोलत होते.यावेळी यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित डूबल, चीफ इंजिनिअर सतीश पिसाळ, चीफ केमिस्ट सुनील कोकितकर, शेती अधिकारी वैभव नलवडे, लेबर ऑफिसर रणजित चव्हाण, आयटी मॅनेजर चंद्रकांत खराडे, स्टोअर किपर संतोष ननावरे, परचेस ऑफिसर अश्विन कदम,गोडावून किपर महादेव यादव,अकौंटंट रवी पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. धैर्यशील कदम म्हणाले की, गत हंगामातील पहिला हप्ता २० दिवसात ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केल्या मुळे शेतकरी बांधवामध्ये समाधाना चे वातावरण आहे. वर्धन हा एक ब्रँड म्हणून नावारूपास येत आहे.आज देशातील डी. मार्टच्या प्रत्येक स्टोअर पर्यंत वर्धन ची साखर आणि जागरी पावडर पोहचली आहे. भविष्यात अजून नवीन उद्योग येथे येणार असून. हजारो लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे.आपल्यासह सर्वांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे कदम यांनी सांगितले.कारखान्याचे कार्यकारी संचालक विक्रमशील कदम म्हणाले की धैर्यशील कदम यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना झेप घेण्यासाठी सज्ज आहे. कारखाना वेळेत सुरू करण्यासाठी तोडणी वाहतुकीचे करार पूर्णत्वास आलेले आहेत. कंत्राटदारांना पहिला हप्ता खात्यावर वर्ग केला असून यंत्रणा ऑगस्ट अखेर कारखान्यावर दाखल होणार आहे. भागातील तोडणी वाहतूकदार करार करण्यासाठी इच्छुक असतील त्यांनी शेती विभागाशी संपर्क साधावा. तसेच ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी कारखाना कर्मचाऱ्यांच्याकडे ऑनलाईन पद्धतीने ऊस नोंदणी करण्याचे आवाहन त्यांनी केले. 

COMMENTS