वडिलांना झालेल्या मारहाणीचा घेतला बदला.

Homeताज्या बातम्यादेश

वडिलांना झालेल्या मारहाणीचा घेतला बदला.

तरुणाच्या डोळ्यावर झाडली गोळी.

दिल्ली प्रतिनिधी- दिल्ली(Delhi) तील जहांगीरपुरी(Jahangirpuri) भागात एका अल्पवयीन मुलाने वडिलांना झालेल्या मारहाणीचा बदला घेण्यासाठी, एका तरुणावर ग

सामाजिक न्याय विभागाकडून ‘त्या’ संस्थांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न
प्रोत्साहन निधीपासून वंचित असणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणार – विधानपरिषद आमदार सुनिल शिंदे
म्हसवड शहरातील 10 घरांमध्ये चोरी; लाखोचा मुद्देमाल लंपास

दिल्ली प्रतिनिधी- दिल्ली(Delhi) तील जहांगीरपुरी(Jahangirpuri) भागात एका अल्पवयीन मुलाने वडिलांना झालेल्या मारहाणीचा बदला घेण्यासाठी, एका तरुणावर गोळी झाडल्याची खळबळजनक घटना घडली आहे. घटनेच्या वेळी जखमी मुलगा पार्कजवळ बसला होता. यावेळी तीन अल्पवयीन मुलं तेथे आले आणि त्यांतील एकाने त्याच्यावर गोळी झाडली व तेथून पळ काढला. गोळी जखमी तरुणाच्या डोळ्यावर लागली आहे. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे. याप्रकरणी जहांगीरपुरी पोलिसांनी(Jahangirpuri Police) आयपीसीच्या कलम 307 नुसार, गुन्हा दाखल केला आहे.

COMMENTS